भिवंडीत डान्सबार वर छापा; २२ बारबालांसह एकूण ३४ जणांविरोधात कारवाई
By नितीन पंडित | Published: August 10, 2023 02:31 PM2023-08-10T14:31:43+5:302023-08-10T14:33:05+5:30
या कारवाईत २२ बारबालांसह ९ ग्राहक व मालक व्यवस्थापक अशा एकूण ३४ जणांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडी: राहनाळ येथे सुरु असलेल्या डान्स बारवर बुधवारी पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत २२ बारबालांसह ९ ग्राहक व मालक व्यवस्थापक अशा एकूण ३४ जणांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहनाळ गावाच्या हद्दीतील कांचन कंपाऊंड येथे सपना बार अँड रेस्टॉरंट असून याठिकाणी बारबाला व ग्राहक हे अश्लिल हावभाव व नृत्य करत असल्याची खबर पोलिसांना मिळताच या ठिकाणी छापा मारत पोलिस नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कोळी यांनी दिलेल्या तक्रारी वरून बार मालक विशंबर जीवन सुरवसे,व्यवस्थापक अविनाश गोपीनाथ सुर्यवंशी,रोहीत विशंबर सुरवसे,यांच्यासह २२ बार बाला व ग्राहक संतोष गणपत ढसाळ,मुकेश गोपीनाथ म्हात्रे,अनिल यशवंत झाडे,सागर शिवाजी पाटील,बालाजी दत्तु रायकर,दिनेश भारत उमाटे,मनिष अरविंद गोसराणी,परवेज नसीम अन्सारी,गफार रहीम शेख अशा एकूण ३४ जणांवर नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.