भिवंडीत लेडीज बारवर छापा; २५ बारबालांसह एकूण ५४ जणांविरोधात गुन्हा दाखल
By नितीन पंडित | Updated: February 17, 2024 16:43 IST2024-02-17T16:42:50+5:302024-02-17T16:43:25+5:30
कारवाई झालेला सिल्व्हर ऑर्केस्ट्रा बार हा नारपोली पोलिस ठाण्यापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर आहे.

भिवंडीत लेडीज बारवर छापा; २५ बारबालांसह एकूण ५४ जणांविरोधात गुन्हा दाखल
भिवंडी :शहरात लेडीज ऑर्केस्ट्रा बारचे पेव फुटले असून या ठिकाणी सर्रासपणे बारबाला अश्लील वर्तन करताना आढळतात.अशाच पद्धतीने सुरू असलेल्या सिल्व्हर पॅलेस बारवर पोलिसांनी केलेल्या कारवाईत अश्लील हावभाव करणाऱ्या २५ बारबालांसह एकूण ५४ जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कारवाई झालेला सिल्व्हर ऑर्केस्ट्रा बार हा नारपोली पोलिस ठाण्यापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर आहे.
शहरातील अंजुर फाटा रस्त्यावर असलेल्या हॉटेल सिल्वर पॅलेस बार ॲन्ड रेस्टॉरन्ट येथे शुक्रवारी रात्री अकरा वाजता बार मधील व्यवस्थापक,म्युझिक ऑपरेटर यांनी बार मध्ये हिंदी गाणे लावून बार मधील २५ बारबाला तंग व तोकडे कपडे घालून अश्लिल कृत्य व विभत्स वर्तन करुन ग्राहकांना आकर्षित करीत असताना आढळून आल्याने पोलिसांनी याठिकाणी केलेल्या कारवाईत व्यवस्थापक,म्युझिक ऑपरेटर,२५ बारबाला,१८ ग्राहक,९पुरुष वेटर अशा एकूण ५४ जणां विरोधात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून नोटीस देऊन सोडून देण्यात आले.