रेल्वे प्रवाशांनो एक व्हा; मुंब्रा रेल्वे स्टेशन येथील प्रवाशांसोबत जितेंद्र आव्हाडांची बैठक
By रणजीत इंगळे | Published: September 4, 2022 03:12 PM2022-09-04T15:12:42+5:302022-09-04T15:14:51+5:30
मुंब्रा आणि कळवामधून ३ लाख लोक जातात. आमची लोकल ट्रेन बंद केली तर, आम्हीही एसी लोकल बंद करणार असल्याचा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला.
ठाणे- रेल्वे प्रवाशांनो एक व्हा, असं म्हणत मुंब्रा रेल्वे स्टेशन येथील प्रवाशांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बैठक घेतली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे प्रशासनाला इशारा दिला.
मुंब्रा आणि कळवामधून ३ लाख लोक जातात. आमची लोकल ट्रेन बंद केली तर, आम्हीही एसी लोकल बंद करणार असल्याचा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला. आम्ही राजकीय रंग देत नाही, कुठेही पक्षाच्या नावाने काम करत नाही. हा जनतेचा आवाज आहे, असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.
लोक सांगत होते की, एसी लोकल बंद करा. आम्हाला अर्धातास उशीर होत आहे. अर्धातास जर माणूस उशिरा पोहोचला तर त्याची सुट्टी लावली जातेय. उशिरा कामावरती पोहल्यावर खाडा होतो. मग या नागरिकांचा पगार कोण देणार, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला. लोकलच्या फेऱ्या ज्या रद्द केल्या आहेत, त्या पूर्ववत करा. बाकीचे काही रेल्वेला करायचे ते करा, असंही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितलं.