मनसेच्या आंदोलनावर रेल्वे प्रवासी संघटनांची सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 07:38 PM2018-09-05T19:38:42+5:302018-09-05T19:39:09+5:30

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास जीवघेणा झाला असून कोणालाही उलट्या दिशेने प्रवास करण्याची इच्छा नाही.

Rail travel commentary on the MNS movement | मनसेच्या आंदोलनावर रेल्वे प्रवासी संघटनांची सडकून टीका

मनसेच्या आंदोलनावर रेल्वे प्रवासी संघटनांची सडकून टीका

Next

डोंबिवली: मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास जीवघेणा झाला असून कोणालाही उलट्या दिशेने प्रवास करण्याची इच्छा नाही. त्यात वेळ जातो, पाससाठी पैसे जातात पण पर्यायाअभावी तसे करावे लागते, असे सांगत तेजस्वीनी महिला प्रवासी संघटनेने मनसेच्या आंदोलनाला विरोध केला. प्रवाशांना वेठीस धरून केल्या जाणा-या आंदोलनाला महिला प्रवासी संघटना कधीही समर्थन करणार नसून सामंजस्याने, चर्चेने समस्या सोडवण्यावर भर देणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

उलट दिशेने प्रवास करणा-या प्रवाशांचे समर्थन नाही, पण त्यांना असलेल्या अडचणी जाणून घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे ज्यांनी आंदोलन केले त्यांनी आधी प्रवाशांशी चर्चा करावी, त्यांच्या व्यथा समजून घ्याव्यात. त्या सोडवण्यासाठी प्रवाशांना वेठीस धरणे, रेल्वे प्रशासनासह पोलीस यंत्रणेला कार्यवाहीसाठी भाग पाडणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया अध्यक्षा लता अरगडे यांनी व्यक्त केली. ज्यांच्या वयाची ३५/४० वर्षे झाली आहेत, अशा महिलांसह पुरुषांना गर्दीच्या स्थानकांमधून प्रवास करताना अनंत अडचणी आहेत. त्यामुळे त्यातील काही प्रमाणात प्रवासी डाऊन अप अशा उलट्या प्रवासाचा तोडगा स्वीकारतात. त्यामुळे आंदोलन करणे हा उपाय नाही, तर सामंजस्याने समस्या सोडवण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.

केवळ अंबरनाथ स्थानकातील ही समस्या नसून ठाणे, कळवा, दिवा, कोपर, डोंबिवली, ठाकुर्ली, कल्याणसह बदलापूर, टिटवाळा आदी स्थानकांमध्ये तसेच पश्चिम रेल्वेच्या लांबच्या गाड्यांमध्ये असा प्रवास केला जातो. डोंबिवली स्थानकातून सकाळच्या वेळेत प्रवास करताना प्रचंड हाल होतात. पण तरीही येथील प्रवासी कोपर, दिव्यापासून आलेल्या प्रवाशांसोबत बंधूभावानेच वागतात. त्यामुळे तो पर्याय नसून गाड्या वाढवणे, तसेच डब्यांमध्ये काही जागा या संबंधित स्थानकांमधील प्रवाशांना देणे असे विविध पर्याय असू शकतात. कल्याणच्या प्रवाशांनी असा तोडगा काढला असल्याचे त्यांनी सांगितले.

  •  यासंदर्भात प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, मनसेचे रेल्वे विषय प्रमुख जितू पाटील यांना संपर्क साधून पक्षाध्यक्ष राज ठाकरेंनाही हे आंदोलन होणे अपेक्षित नसेलच, त्यामुळे संघटनांच्या भावना पोहोचवा असेही आवाहन केले.
  • प्रवाशांना वेठीस धरणे उचित नाहीच, सहप्रवासी म्हणुन सगळयांना सांभाळून घेणे आवश्यक आहे. सामंजस्याची भूमिका महत्वाची आहे. प्रवाशांनी ठिकठिकाणच्या संघटनांकडे यावे सगळे मिळून सुवर्णमध्य काढू - राजेश घनघाव, अध्यक्ष के३ संघटना
  • बदलापूरच्या प्रवाशांनाही अनेक समस्या आहेत, त्या स्थानकातून सुटणा-या लोकलमध्येही ठिकठिकाणाहून प्रवासी येतात, पण म्हणुन काही त्यांच्यावर कारवाई करावी असा पवित्रा योग्य नाहीच. त्यामुळे आंदोलनाचे समर्थन नाहीच - संजय मेस्त्री, बदलापूर
  • आंदोलनाचा विषय नसून प्रबोधनाचा विषय आहे, प्रवाशांच्या भावना समजून घेणे आहे. पास काढणा-यांना आपण रोखू शकत नाही. तिकिट नसणा-यांना रोखणे योग्य पण नाहक प्रवाशांना वेठीस धरणे योग्य नाही - अ‍ॅड.आदेश भगत, सदस्य, डिआरयुसीसी, मध्य रेल्वे

Web Title: Rail travel commentary on the MNS movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.