पत्रीपुलाच्या कामात रेल्वेचे असहकार्य? नरेंद्र पवार यांनी ‘एमएसआरडीसी’कडून घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 03:12 AM2018-12-23T03:12:04+5:302018-12-23T03:13:15+5:30

कल्याणमधील पत्रीपूल धोकादायक झाल्यामुळे पाडण्यात आला. महिना उलटला तरी या पुलाचे काम बंद आहे.

Rail uncomfortable in the work of Patipul? Narendra Pawar took a review from MSRDC | पत्रीपुलाच्या कामात रेल्वेचे असहकार्य? नरेंद्र पवार यांनी ‘एमएसआरडीसी’कडून घेतला आढावा

पत्रीपुलाच्या कामात रेल्वेचे असहकार्य? नरेंद्र पवार यांनी ‘एमएसआरडीसी’कडून घेतला आढावा

Next

डोंबिवली : कल्याणमधील पत्रीपूल धोकादायक झाल्यामुळे पाडण्यात आला. महिना उलटला तरी या पुलाचे काम बंद आहे. आमदार नरेंद्र पवार यांनी महाराष्टÑ राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अधिकाऱ्यांसोबत शनिवारी पुलाची पाहणी केली. तेव्हा या अधिका-यांकडे पवार यांनी बांधकामाबाबत विचारणा केली असता रेल्वे प्रशासनाकडून काही तांत्रिक परवानग्यांना विलंब लागत असल्याने काम रखडल्याचे सांगितले.
पत्रीपुलाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पवार यांच्यासोबत एमएसआरडीसीचे उपअभियंता अनिरुद्ध बोरडे, कंत्राटदार दीपक मंगल, सल्लागार एल.एन. मालवीय उपस्थित होते. १८ नोव्हेंबरला मध्य रेल्वेने सहा तासांचा पॉवरब्लॉक घेऊ न १०४ वर्षांचा जुना पत्रीपूल पाडण्यात आला. तेव्हा याठिकाणी लवकरात लवकर नवा पूल उभारण्याचे आश्वासन एमएसआरडीसीने दिले होते. मात्र, महिना उलटूनही पुलाचे काम कूर्मगतीने सुरू असल्याने पवार यांनी संताप व्यक्त केला. सध्या वाहतुकीचा संपूर्ण भार हा बाजूलाच असलेल्या नव्या पुलावर येत असून वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. वारंवार विचारणा करूनही अधिकारी माहिती देत नसल्याने पवार यांनी या पुलाच्या कामाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संबंधित अधिकाºयांची धावाधाव झाली. अधिकाºयांना काम रखडण्यामागचे कारण विचारताच रेल्वेकडून तांत्रिक परवानग्या मिळण्यात विलंब लागत असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर, पवार यांनी खासदार कपिल पाटील यांना संपर्क साधला असता त्यांनी यावर तत्काळ तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

रेल्वेने सहकार्य केल्यास
वर्षभरात पूल बांधणार
रेल्वेने सहकार्य केल्यास वर्षभरात पूल उभा राहण्याचे आश्वासन अधिकाºयांनी पवार यांना दिले. त्यावर यापुढे रेल्वेकडून कसलाही विलंब होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार असल्याचे सांगितले. नागरिकांना होणारा त्रास आणि शहरातील वाहतुकीवरील ताण लक्षात घेता संबंधित सर्व यंत्रणांनी नव्या पत्रीपुलाच्या बांधकामाला गती देण्याची आवश्यकता असल्याचे पवार म्हणाले.

Web Title: Rail uncomfortable in the work of Patipul? Narendra Pawar took a review from MSRDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे