घोलाईनगर, रेती बंदर उड्डाणपूलाला रेल्वेची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2015 10:04 PM2015-06-09T22:04:49+5:302015-06-09T22:04:49+5:30
अनेक वर्षांपासून रेतीबंदर आणि घोलाई नगर येथील स्थानिकांनी पादचारी पुलाची मागणी केली होती.
ठाणे : अनेक वर्षांपासून रेतीबंदर आणि घोलाई नगर येथील स्थानिकांनी पादचारी पुलाची मागणी केली होती. राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी याचा पाठपुरावा केल्यानंतर अवघ्या २० दिवसात या दोन्ही पुलांना मंजूरी दिल्याचे पत्र मध्य रेल्वे विकास कॉर्पोरेशनने दिले आहे. एमएसआरडीसीच्या माध्यमातून या पुलाची उभारणी करण्यात येणार आहे.
रेतीबंदर भागात रेल्वेने भिंत बांधल्यामुळे पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून रुळ ओलांडावे लागत होते. या पार्श्वभूमीवर पादचारी पुलाची निकड निर्माण झाली होती. स्थानिकांनी या पुलांची मागणी केल्यानंतर आ. आव्हाड यांनी रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ५ मे रोजी पत्र दिले होते.
त्याच पत्राच्या अनुषंगाने २६ मे रोजी कार्पाेरेशनचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक परमजीत सिंग यांनी या दोन्ही पुलांच्या उभारणीला हिरवा कंदील दिल्याचे आव्हाड यांनी सांगितले. या पुलांमुळे १५ ते २० हजार पादचाऱ्यांची सोय होणार असून पुलांअभावी रेल्वे मार्ग ओलांडणाऱ्या प्रवाशांचा नाहक बळी जाणार नाही.