Video: रेल्वे पोलिसाने सीपीआर देत वाचवले तरुणाचे प्राण; अंबरनाथ रेल्वे स्थानकातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 09:20 PM2021-10-18T21:20:50+5:302021-10-18T21:21:14+5:30

Ambernath Railway Station: पोलिसांच्या तत्परतेच्या उपचारांनी तरुण पुन्हा आला शुद्धीत; सीसीटीव्हीत कैद

Railway police rescued the youth by giving CPR; Incident at Ambernath railway station | Video: रेल्वे पोलिसाने सीपीआर देत वाचवले तरुणाचे प्राण; अंबरनाथ रेल्वे स्थानकातील घटना

Video: रेल्वे पोलिसाने सीपीआर देत वाचवले तरुणाचे प्राण; अंबरनाथ रेल्वे स्थानकातील घटना

Next

अंबरनाथ : रेल्वे पोलिसाने हृदयविकाराचा झटका आलेल्या एका तरुणाला  "कार्डियो पल्मोनरी रिससिटैशन"  (सीपीआर) देत त्याचे प्राण वाचवल्याची घटना अंबरनाथ रेल्वे स्थानकात घडली आहे. ही घटना रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झाली आहे.

 अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर ३ वर १५ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. सकाळी ११ वाजताच्या सुमारास महेश सुर्वे नावाचा २२ वर्षीय तरुण प्लॅटफॉर्मवर असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागलं आणि तो खाली कोसळला. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता होती. यावेळी तिथे उपस्थित रेल्वे पोलीस कर्मचारी मोहन दास यांनी तिथे धाव घेत महेश सुर्वे याला सीपीआर पद्धतीने प्राथमिक उपचार दिले. त्यामुळं काही वेळातच महेश हा शुद्धीवर आला.  ही घटना रेल्वे स्थानकात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. त्यानंतर इतर प्रवाशांच्या मदतीने महेश याला रेल्वे स्थानकातील दवाखान्यात नेण्यात आलं.



 

तिथे प्राथमिक उपचार करून त्याला नातेवाईकांसोवत खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले. रेल्वे पोलिसाच्या तत्परतेमुळे प्रवाशाचे प्राण वाचल्याने  सध्या रेल्वे पोलीस मोहन दास यांचे  कौतुक होत आहे. तसेच रेल्वे पोलिसांसोबत इतर प्रवाशांनी देखील त्या तरुणाला वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे.

Web Title: Railway police rescued the youth by giving CPR; Incident at Ambernath railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे