रेल्वे सुरक्षा बलाने परत केली 25 कोटीच्या धनादेशाची बॅग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 09:21 PM2018-04-06T21:21:52+5:302018-04-06T21:21:52+5:30
25 कोटी रुपयांच्या धनादेशाची बॅग रेल्वेत विसरले आणि त्यांना घामच फुटला. त्यांनी रेल्वेला फोन केला तेव्हा त्यांची बॅग रेल्वे सुरक्षा बलाकडे असल्याचे कळताच त्यांचा जीव भांडय़ात पडला
कल्याण- 25 कोटी रुपयांच्या धनादेशाची बॅग रेल्वेत विसरले आणि त्यांना घामच फुटला. त्यांनी रेल्वेला फोन केला तेव्हा त्यांची बॅग रेल्वे सुरक्षा बलाकडे असल्याचे कळताच त्यांचा जीव भांडय़ात पडला. कल्याणमध्ये राहणारे राजाराम मोरे हे एका खाजगी एजेन्सीमध्ये काम करातात. ही एजेन्सीद्वारे बँकेचे धनादेश गोळा केले जातात. राजाराम हे त्यांच्या साथीदारासह कल्याणहून 12 वाजून 53 मिनिटांची मुंबईकडे जाणारी लोकल गाडी पकडली. राजारामची टिमकडे एका बॅगेत 25 कोटीचे धनादेश होते. राजाराम दादर स्थानकात कामानिमित्त उतरले. त्यांच्या टिमचे अन्य सदस्य हे मुंबई स्थानकाकडे निघून गेले. काही तासानंतर एका बँकेतून फोन आला की, एलआयसीचे धनादेश अद्याप प्राप्त झालेले नाही. राजारामने त्वरीत आपल्या टीमच्या साथीदाराना फोन करुन विचारणा केली की, बॅकेतून फोन आला होता. एलआयसीचे धनादेश अद्याप मिळालेली नाही. त्याच्या सहका:यांनी आमच्या कडे धनादेशाची ती बॅगच नाही. हे उत्तर ऐकून राजारामला दरदरुन घाम फुटला. त्याने कल्याण, डोंबिवली अशा प्रत्येक रेल्वे स्थानकात कळविण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना रेल्वे प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला की, त्यांची बॅग ही दादर स्थानकातील रेल्वे सुरक्षा बलाकडे आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या महिला कॉन्स्टेबल निर्मला सूर्यवंशी व बी. एन. यादव यांनी राजाराम यांना 25 कोटी रुपयांचे धनादेशाची बॅग परत केली तेव्हा कुठे राजाराम यांचा जीव भांडय़ात पडला. त्यांनी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांचे व रेल्वे प्रशासनाने दिलेल्या तातडीच्या प्रतिसादाबद्दल शतश: अभार मानले आहेत.