कसारा रेल्वे घाटात दरड कोसळल्याने रेल्वे सेवा विस्कळीत; रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने पर्यटकांचा हिरमोड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 12:17 PM2024-08-03T12:17:03+5:302024-08-03T12:18:16+5:30

सकाळी साडेसात  वाजे पासून रेल्वे चे कर्मचारी रेल्वे ट्रॅक वरील दरडी व मातीचा मलबा हटवण्यासाठी प्रयत्न करीत होते तर महाकाय दगड उचलण्यासाठी क्रेन,जेसीबी ची मदत घेण्यात आली.

Railway services disrupted due to crack in Kasara railway ghat; | कसारा रेल्वे घाटात दरड कोसळल्याने रेल्वे सेवा विस्कळीत; रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने पर्यटकांचा हिरमोड

कसारा रेल्वे घाटात दरड कोसळल्याने रेल्वे सेवा विस्कळीत; रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने पर्यटकांचा हिरमोड

कसारा - शाम धुमाळ : सतत कोसळणाऱ्या पावसामुळे आज नाशिक कल्याण मार्गांवरील कसारा घाटात टी.जी .आर.3 या बोगद्या जवळ सकाळी 7 वाजेच्या सुमारास महाकाय दरडी रेल्वे ट्रॅक वर कोसळल्याने मुंबईकडे जाणाऱ्या अप च्या रेल्वे ट्रॅक वर मोठ्या प्रमाणात  दगडी,व माती चा मलबा पडल्याने  मुबईकडे येणाऱ्या मेल, एक्सप्रेस गाड्या चे वेळापत्रक विस्कळीत झाले परिणामी अप लाईन ने जाणाऱ्या गाड्या ची वाहतूक मिडल लाईन ने वळवून रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात रेल्वे प्रशासनास यश आले.

दरम्यान, सकाळी साडेसात  वाजेपासून रेल्वे चे कर्मचारी रेल्वे ट्रॅक वरील दरडी व मातीचा मलबा हटवण्यासाठी प्रयत्न करीत होते, तर महाकाय दगड उचलण्यासाठी क्रेन,जेसीबी ची मदत घेण्यात आली. दरम्यान एकी कडे मुसळधार कोसळणारा पाऊस तर दुसरीकडे रेल्वे ट्रॅक वर पडणारा माती, दगडाचा मलबा यामुळे कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते.

थोडक्यात बचावल्या मेल एक्सप्रेस गाड्या

दरम्यान सकाळी मुंबई कडे जाणाऱ्या राज्यराणी, पंचवटी एक्सप्रेस ची वेळ असते  आज सकाळी राज्यराणी एक्सप्रेस इगतपुरी रेल्वे स्थानकात असतानाच घाटात दरड कोसळल्याने  पुढील अनर्थ टळला .

उंबरमाळी जवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने सकाळची रेल्वे सेवा ठप्प. दरम्यान आज सकाळी 6 वाजे च्या सुमारास उंबरमाळी रेल्वे स्थानका दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने गर्दी च्या वेळी  1 तासा हून अधिक काळ रेल्वे वाहतूक् ठप्प होती कसाराकडे येणाऱ्या मेल एक्सप्रेस सह लोकल गाड्या खर्डी ते टिटवाळा दरम्यान तास भर रखडल्या होत्या.परिणामी त्यामुळे चाकरमानी प्रवाशा सह अन्य प्रवाशा चे हाल झाले.

गटारी साठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड

दरम्यान,  शनिवार,रविवार सुट्टी असल्याने शेकडो मुंबईकर कसारा, इगतपुरी सह भंडारदरा,अकोलेकडे जाण्यासाठी कसारा येथे उतरून खासगी वाहणाने  जातात परतू आज सकाळ पासूनच पाऊसाची फटकेबाजी सुरु असल्यने रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला.

Web Title: Railway services disrupted due to crack in Kasara railway ghat;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.