कसऱ्यात रेल्वेची सिग्नल केबल चोरणाऱ्यास २४ तासांत अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:46 AM2021-09-05T04:46:41+5:302021-09-05T04:46:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली, कसारा : कसारा घाटातील जंगल भागात रेल्वे रुळालगत असलेली सिग्नलची केबल तोडून चोरून नेल्याची घटना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली, कसारा : कसारा घाटातील जंगल भागात रेल्वे रुळालगत असलेली सिग्नलची केबल तोडून चोरून नेल्याची घटना शुक्रवारी घडली होती. कसारा रेल्वे पोलीस दलाच्या (आरपीएफ) पथकाने राणा या श्वानाच्या मदतीने अवघ्या २४ तासांत चोरट्याला शनिवारी जेरबंद केले.
यासंदर्भात माहिती देताना आरपीएफ कसाऱ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनुमान सिंग म्हणाले की, सिग्नलची केबल चोरून ज्ञानेश्वर टोकरे (रा. उंबरखांड, तालुका शहापूर) हा चोर नजीकच्या जंगलात अनोळखी ठिकाणी झोपडीत लपला होता. त्याला आमच्या पथकातील राणा या श्वानाने शोधून काढले. सिग्नल केबल खूप महत्त्वाची असते, ती तोडल्याने रेल्वे सेवेवर परिणाम झाला नसला तरी त्या चोराचा शोध घेणे हे आरपीएफ पथकासाठी आव्हान असते; पण राणा श्वानाच्या अमूल्य योगदनामुळे अवघ्या काही तासांत त्या चोराचा शोध लागला आणि चोरी पकडली गेली. चोराकडून कुऱ्हाड आणि चोरलेली केबल, असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. भारतीय रेल्वे कायद्यानुसार चोरावर पुढील कारवाई केली जाणार आहे.
--------