पावसाची संततधार सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:24 AM2021-07-23T04:24:29+5:302021-07-23T04:24:29+5:30
ठाणे : मागील चार दिवसापासून सुरू असलेला पावसाचा जोर गुरुवारी काहीसा कमी झाला. ठाण्यात मागील २४ तासात १०१.०६ ...
ठाणे : मागील चार दिवसापासून सुरू असलेला पावसाचा जोर गुरुवारी काहीसा कमी झाला. ठाण्यात मागील २४ तासात १०१.०६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी दिवसभरात ८.०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रात्रीपासून झालेल्या पावसाने झाडे, भिंती आणि पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या आहेत. वृक्ष उन्मळून पडण्याच्या ३४ घटना घडल्या असून, मुंब्य्रात चार वृक्ष पडल्याने सहा घरांचे नुकसान झाले आहे. शहरातील चार सखल भागात बुधवारी रात्री पाणी साचले होते.
शनिवारी रात्रीपासून पावसाने चांगला जोर धरला होता. गुरुवारी जोर कमी झाला. दिवसभरात ८.०५ मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या २४ तासात १०१.०६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे सखल भागात पाणी साचले होते. पाणी तुंबण्याच्या अवघ्या तक्रारी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे आल्या. शहरात ३४ ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंब्य्रात चार वृक्ष पडल्याने सहा घरांचे नुकसान झाले. येथील रहिवाशांना त्यांच्या नातेवाईकांच्या घरी हलविण्यात आले आहे. शहरात नऊ ठिकाणी झाडाच्या फांद्या पडल्या, तर सहा ठिकाणी वृक्ष धोकादायक स्थितीत आले आहेत.