पावसाने जरी खेळ मांडला..तरी अभिनय कट्टा एकपात्रीच्या जुगलबंदीने रंगला'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 04:34 PM2019-07-09T16:34:07+5:302019-07-09T16:37:19+5:30
भर पावसातही खंड न पडता अभिनय कट्टा पुन्हा उभा राहिला.
ठाणे : १ जुलै रोजी पाऊस ठाणेमुंबईत बेभान पाने बरसला.आणि त्याच दरम्यान ठाण्याच्या सांस्कृतिक चळवळीतील सोन्याचं पान असलेला अभिनय कट्टा संपूर्ण पाण्याखाली होता.पुन्हा एकदा पाऊसामुळे ह्या चळवळीत खंड पडतो की के असे सर्वांना पुन्हा वाटले.पण अभिनय कट्ट्याचे कलाकार संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा ह्या परिस्थितीतून उभे राहिले.आणि कुसुमाग्रजांच्या कवितेप्रमाणे मोडला जरी संसार..मोडला नाही कणा.. ह्या कवितेला सार्थ असा कट्टा क्रमांक ४३६ सादर झाला.
अभिनय कट्ट्यांचा ४३६ पर्यंतचा प्रवास हा अनेक अडथळ्यांचा सामना करून झाला त्याचे करण म्हणजे येथील कलाकारांचा कलेविषयीचे प्रामाणिक प्रेम आणि रसिक मायबाप प्रेक्षकांचे प्रेम आणि आशीर्वाद.अभिनय कट्टा क्रमांक ४३६ म्हणजे अभिनय कट्ट्याच्या एकपात्री सादरीकरणाची जबरदस्त जुगलबंदी.जणू काही बाहेर बरसणाऱ्या त्या पावसाला आपल्या अभिनयसामर्थ्याने अभिनय कट्ट्याचे कलाकार आव्हान देत होते.सादर कार्यक्रमाचे निवेदन अभिनय कट्ट्याच्या कलाकार माधुरी कोळी ह्यांनी केले. बालकलाकार *अमोघ डाके ह्याने 'ज्योतिषी' एकपात्रीने कट्ट्याची सुरुवात केली.त्यानंतर शुभांगी भालेकर ह्यांनी 'मुखवटा', न्यूतन लंके हिने 'खर सांगायचं तर', अभय पवार ह्याने 'लग्नानंतरचे प्रेम', रोहिणी थोरात ह्यांनी 'एअर होस्टेस', प्रतिभा घाडगे ह्यांनी 'खरच मोबाईलची गरज आहे का', सई कदम हिने 'ती फुलराणी', सहदेव कोळम्बकर ह्याने 'मी कधी कुणाक काय सांगतय का' आणि परेश दळवी ह्याने 'मी रंगकर्मी' ह्या एकपत्रीच्या सादरीकरण केले. सदर कार्यक्रमात कट्टा क्रमांक ४३५ वरील *फिल्मी चक्कर स्पर्धेचे विजेते घोषित करण्यात आले.प्रथम क्रमांक 'जिस देश माई गंगा रेहता है' (कदिर शेख,विद्या पवार,अतिष जगताप), द्वितीय क्रमांक 'जुदाई' (सहदेव साळकर,अभय पवार,माधुरी कोळी) आणि उत्तेजनार्थ 'रुपकी राणी चोरोका राजा' (रोहिणी थोरात, प्रतिभा घाडगे, दत्तराज सकपाळ) ह्या सादरीकरणाना देण्यात आला. अभिनय कट्टा कधी थांबला नव्हता आणि कधी थांबणार नाही..कठीण परिस्तिथीवर मत करून रसिकमायबापांचा मनोरंजनासाठी पुन्हा उठून उभा राहतो तोच सच्चा कलाकार.प्रत्येक पावसात ही परिस्थिती निर्माण होते.पण अभिनय कट्ट्याच्या कलाकार थांबत नाही.आजचा कट्टा हे त्याच उदाहरण आहे.मोजक्या तांत्रिक गोष्टीच्या आधारे आजची एकपत्रीच्या हुगलबंदी रंगली.आपले प्रेम आशीर्वाद असेच राहुदेत जेणेकरून अशा अडथळ्यांवर आम्ही मात करत राहू असे आवाहन अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी उपस्थित प्रेक्षकांना केले.