ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपले; भातसाचे दरवाजे उघडले

By सुरेश लोखंडे | Published: September 8, 2022 08:52 PM2022-09-08T20:52:30+5:302022-09-08T20:53:35+5:30

या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतुकीला मोठा अथळा निर्माण झाला.

rain lashed thane district the doors of bhatsa dam were opened | ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपले; भातसाचे दरवाजे उघडले

ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपले; भातसाचे दरवाजे उघडले

Next

सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सायंकाळी ४ वाजता येणाऱ्या पावसाने आजही जिल्हह्याला झोडपले. यामुळे ट्रकवर पाणी साचल्यामुळे उपनगरीय लोकल गाड्याचे ऐन संध्याकाळी वेळापत्रक कोसळल्यामुळे विद्यार्थ्यांसह चाकरमान्यांचे हाल झाले. तर एक महिन्यापूर्वी भातसाचे दरवाजे उघडलेले असतानाही आज त्यात वाढ करू ०.५० मीटरने हे दरवाजे आज उघडण्याचा प्रसंग या मुसळधार पावसामुळे ओढावल आहे.

सायंकाळी ४ वाजता एक तास भर पडलेल्या या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतुकीला मोठा अथळा निर्माण झाला तर नागरींकांना पाण्यात वाट काढत रस्ता पार करावा लागला. ऐन गर्दीच्या वेळी जोरदार पडलेल्या या पावसामुळे ट्रकवर पाणी साचल्यामुळे जाणारी व येणारी लोकलगा्यांची वाहतूक काही काळ बंद करावी लागली. तर उशिराने सुरू झालेल्या या गाड्यांमध्ये प्रवास्यानी जीव घेणी गर्दी केल्याचे चित्र संध्याकाळी ठाणे रेल्व स्टेशनवर पाहायला मिळाले. तासाभरात ठाण्यात ७१ मिमी पाऊस पडल्याची नोंदा घेण्यात आली आहे. 

या दरम्यान विटावा ब्रीजखाली मोठ्याप्रमाणात पाणी साचल्यामुळे या महामार्गावरील वाहतूक बंद करावी लागली. येथील महात्मा फुले नगर जवळील मीत अपार्टमेंट २२ वर्षे जुन्या  इमारती जवळ असलेली नाल्याची भिंत व इमारतीची संरक्षण भिंत नाल्यामध्ये पडली आहे. कळव्यात घरं पडली, भास्करनगर  येथे दोन मजली घर पडल्याची नोंद घेण्यात आली आहे. रेल्व प्लॅटफार्म एक जवळील दादापाटील वाडीतील राजदर्शन सोसायटी परिसरात मोठ्याप्रमाणात पाणी साचल्यामुळे रहिवाश्यांचे हाल झाले. कोपरीत एक झाड घरावर पडले आहे. 

Web Title: rain lashed thane district the doors of bhatsa dam were opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.