Rain Live Update: मिरा भाईंदरला मुसळधार पावसाचा तडाखा, ठिकठिकाणी साचले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 04:30 PM2018-06-25T16:30:45+5:302018-06-25T16:33:32+5:30

संततधार पाऊस व वाऱ्या मुळे मीरा भाईंदर मध्ये ५ ठिकाणी झाडं पडली .

Rain latest Update: heavy rain in Mira Bhaindar, water squeezed | Rain Live Update: मिरा भाईंदरला मुसळधार पावसाचा तडाखा, ठिकठिकाणी साचले पाणी

Rain Live Update: मिरा भाईंदरला मुसळधार पावसाचा तडाखा, ठिकठिकाणी साचले पाणी

googlenewsNext

मीरारोड - संततधार पाऊस व वाऱ्या मुळे मीरा भाईंदर मध्ये ५ ठिकाणी झाडं पडली . यात एका रिक्षावर झाड पडून नुकसान झाले . तर शहरातील अनेक भागात पाणी साचले असून सायंकाळ पर्यंत पाणी कमी झाले नव्हते . अनेक भागात सांडपाणी घरां मध्ये शिरले . ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था व जनजीवन विस्कळीत झाले . काटेकोरपणे न झालेली नालेसफाई, प्लॅस्टिक व थर्माकोलने जाम झालेली गटारे व मोठ्या प्रमाणात झालेले भराव पूरस्थितीला कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे . 

आज दिवसभरात ५ ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना घडल्या . भाईंदर पश्चिमेला आंबेडकर नगर - स्मशानभूमी मार्गावर मोठे झाड पडून झाली उभ्या असलेल्या रिक्षाचे नुकसान झाले . तर नया नगर  लोढा मार्ग ,  घोडबंदर  स्मशानभूमी जवळ , मीरारोडचे चंद्रेश हाईट्स  व उत्तन - डोंगरी मार्गावर झाडं पडली . पालिकेच्या उद्यान विभाग व अग्निशमन दलाने सदर झाडं बाजूला करून रस्ते मोकळे केले . 

तर रात्रभर मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर आज सोमवारी देखील कायम होता . त्यामुळे मीरारोडच्या कृष्ण स्थळ ,  गौरव संकल्प फेस 2, शांतिपार्कचे हॅपी होम कॉम्प्लेक्स,  जांगीड कॉम्प्लेक्स , नित्यानंद नगरचे हायनेस पार्क, मुंशी कंपाउंड , माशाचा पाडा मार्ग - मीनाक्षी नगर , आरएनए ब्रॉडवे एव्हेन्यू , जय विजय नगर ,  सिल्वर पार्क , शीतल नगर , शांती नगर, सिल्वर सरिता, सुंदर सरोवर आदी भागात पाणी साचले होते . 

तर भाईंदरचा टेम्बा मार्ग ,   नवघर, -न्यू आराधना इमारत परिसर , फाटक येथील मनपा पाण्याची टाकी परिसर , राई - शिवनेरी , बाळासाहेब ठाकरे मैदान परिसर ,  फुले मार्ग , बाळाराम पाटील मार्ग येथे पाणी साचल्याच्या तक्रारी होत्या . 

महापालिकेने पाणी साचण्याच्या भागां मध्ये पाणी निचरा करण्यासाठी मोटर पंप लावल्याचे सांगितले आहे . परंतु अनेक ठिकाणी हे पंप कुचकामी ठरले आहेत .  कृष्ण स्थळ ,  गौरव संकल्प फेस 2,  सुंदर सरोवर  आदी अनेक भागात सांडपाणी तुंबले व लोकांच्या घरात आणि दुकानात शिरले . अनेक भागात कमरे एवढे पाणी होते . उभी वाहनं देखील पाण्याखाली गेली . पालिकेचे स्वच्छता निरीक्षक व सफाई कामगार पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारांचे मार्ग मोकळे करत होते . प्लॅस्टिक , थर्माकोल आदीने गटारांची तोंड जाम झाली होती . तर काही ठिकाणी गटारं साफ झाली नसल्याचे समोर आले .  वसई च्या हद्दीत मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाणी साचल्याने वाहनांची रांग थेट वारसावे व काशिमीरा पर्यन्त आली होती . 

Web Title: Rain latest Update: heavy rain in Mira Bhaindar, water squeezed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.