पावसामुळे फळबागांचेही नुकसान, शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 02:24 AM2019-11-25T02:24:51+5:302019-11-25T02:25:28+5:30

ठाणे जिल्ह्यातील ४२ हजार २६२.३१ हेक्टरवरील भात पिकांचे नुकसान झाल्याचे जाहीर झाले. मात्र याप्रमाणेच उपयुक्त असलेल्या २४.१७ हेक्टरवर असलेल्या फळबागांचे नुकसानही कल्याण व अंबरनाथ तालुक्यात झाल्याचे निदर्शनास आले आहे.

Rainfall also leads to loss of orchards, farmers in Worried | पावसामुळे फळबागांचेही नुकसान, शेतकरी हवालदिल

पावसामुळे फळबागांचेही नुकसान, शेतकरी हवालदिल

Next

ठाणे : जिल्ह्यातील ४२ हजार २६२.३१ हेक्टरवरील भात पिकांचे नुकसान झाल्याचे जाहीर झाले. मात्र याप्रमाणेच उपयुक्त असलेल्या २४.१७ हेक्टरवर असलेल्या फळबागांचे नुकसानही कल्याण व अंबरनाथ तालुक्यात झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे १३ लाखांच्या जवळपास नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांच्या नुकसान भरपाईच्या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे.

भाताच्या ४२ हजार हेक्टरसह नागलीचे १२७ हेक्टर आणि वरी पिकाचे ३७ हेक्टर आदी ४२ हजार ४२६.३१ हेक्टरवरील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी पहिल्या टप्प्यात आठ कोटी २० लाख ६८ हजार रूपयांची भरपाई आली आहे. तहसीलदारांच्या नियंत्रणात या रकमेचे वाटपही जिल्ह्यात सुरू आहे. पण फळबागांच्या नुकसानीचीदेखील भरपाई शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे. कल्याण तालुक्यात ८.७२ हेक्टरवरील फळबागा आणि अंबरनाथ तालुक्यातील १५.४५ हेक्टर आदी २४ हेक्टरपेक्षा जास्त फळबागांच्या नुकसानीचा फटका शेतकºयांना बसला आहे. त्यांचीदेखील नुकसान भरपाई शेतकºयाना मिळण्याची अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त होत आहे.

रब्बी हंगामाच्या जनजागृतीसाठी जिल्ह्यात शेतक-यांचे मेळावे

ठाणे : यंदा जिल्ह्यात अतिवृष्टी, पूरस्थिती आणि अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाले. या संकटावर मात करण्यासाठी रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाव्दारे विविध उपक्र म हाती घेण्यात आले आहेत. ३० नोव्हेंबरपर्यंत गावोगावी कृषी मेळावे घेवून भाजीपाल्याचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. कल्याण येथील बापसई येथील मेळाव्यात कलापथकाच्या माध्यमातून शेतकºयांना रब्बीचे महत्त्व पटवून दिले आहे. बापसईचा शेतकरी मेळावा जिल्हा परिषदेचे कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा सभापती किशोर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी कल्याण पंचायत समिती सभापती भारती टेभे, कल्याण तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तसेच कृषि विकास अधिकारी मनोजकुमार ढगे, गटविकास अधिकारी श्वेता पालवे आदी उपस्थित होते. या मेळाव्यात कोसबड हिल कृषी केंद्राचे शास्त्रज्ञ, सर्व कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी भात पीक व भाजीपाला व इतर सर्व पिकाची लागवड, उत्पन्न, सेंद्रीय खतांचा वापर याबाबत योग्य मार्गदर्शन केले. यावेळी कृषी विभागाच्या विविध योजना व पिकाच्या माहितीची घडी पत्रिका वाटप करण्यात आली. एमएसआरएलएम हिरकणी योजनेव्दारे सहा बचत गटांना ५२ हजार ५०० रूपयांच्या धनादेशाचे वाटप यावेळी करण्यात आले. जिल्ह्यातील अन्य गावखे्यांमध्येही रब्बी हंगामाच्या जनजागृतीसाठी उपक्रम हाती घेतले आहेत. त्याद्वारे घेण्यात येत असलेल्या मेळाव्यांमध्ये, गावसभेत शेतकºयांना हरबरा, वाल, मूग आणि इतर कडधान्य लागवडीची माहिती दिली जात आहे. भाजीपाला पिके, कीटकनाशक फवारणी मार्गदर्शन, बीजप्रक्रिया, जिल्हा परिषद तसेच राज्य शासनाच्या कृषि विषयक योजनांची माहिती शेतकºयांना देण्यात येत आहे. बंधारे बांधकामात पुढाकार घेणाºया गावांमध्ये जास्तीत जास्त क्षेत्र भाजीपाला या पिकाखाली येईल यादृष्टीनेही नियोजन सुरू असल्याचे ढगे यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: Rainfall also leads to loss of orchards, farmers in Worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.