मुंबई-ठाण्याच्या धरणांमधील पाणलोट क्षेत्रात पावसाची दडी; गेल्या वर्षी आज भरलेल्या धरणांमध्ये निराशाजनक पाणीसाठा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 04:13 PM2020-07-30T16:13:00+5:302020-07-30T16:13:51+5:30

धरणांच्या पाणी साठ्याविषयी चिंता वाढली आहे. पावसाचा जोर वाढण्याची गरज आहे. अन्यथा यंदा पाणी कपात अटळ दिसून येत आहे.

Rainfall in the catchment area between Mumbai-Thane dams; Disappointing water reserves in dams filled today last year | मुंबई-ठाण्याच्या धरणांमधील पाणलोट क्षेत्रात पावसाची दडी; गेल्या वर्षी आज भरलेल्या धरणांमध्ये निराशाजनक पाणीसाठा 

मुंबई-ठाण्याच्या धरणांमधील पाणलोट क्षेत्रात पावसाची दडी; गेल्या वर्षी आज भरलेल्या धरणांमध्ये निराशाजनक पाणीसाठा 

Next

सुरेश लोखंडे 
ठाणे : मुंबई, ठाण्याला पाणीपुरवठा करणारे जिल्ह्यातील धरणांमध्ये अद्यापही समाधानकारक पाणीसाठा तयार झालेला नाही. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने आतापर्यंत हुलकावणी दिली आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत भरलेल्या मोडक सागरसह, तानसा,  बारवी धरणात धरणांमध्ये 100 टक्के पाणी साठा होऊन ते भरले होते. मात्र या पावसाळ्यात धरणांमध्ये आजपर्यंत 50 टक्केही पाणी साठा झालेला नाही. त्यामुळे धरणांच्या पाणी साठ्याविषयी चिंता वाढली आहे. पावसाचा जोर वाढण्याची गरज आहे. अन्यथा यंदा पाणी कपात अटळ दिसून येत आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहरांना, उद्योग, कारखाने आणि कंपन्यांना पाणी पुरवठा करणार्‍या बारवी धरणात गेल्या वर्षी आजच्या दिवशी 102 टक्के पाणीसाठा होता. जुन्या पाणीपातळीनुसार हे धरण भरले होते. नव्याने वाढवलेल्या उंचीनुसारही ते पुढील तीन दिवसांत भरल्यामुळे दरवाजे उघडावे लागले होते. पण या पावसाळ्यात बारवीत 48.53 टक्के पाणी साठा झाला आहे. आज केवळ 4 मिमी पाऊस पडला आहे. या धरणात आतापर्यंत 165.43 दशलक्ष घनमीटर पाणी साठा तयार झालेला आहे. या आठवड्यात फक्त 7.96 दशलक्ष घनमीटर पाणी साठा वाढला आहे. या प्रमाणेच ठाणे, कल्याण - डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा - भाईंझरला पाणी पुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत पाणी सोडणाऱ्या आंध्रा धरणातही 33.19 टक्के साठा तयार झाला. गेल्या वर्षी तो 72.42 टक्के होता. आज तर या धरणात पाऊस पडलाच नाही.

मुंबईला पाणी पुरवठा करणारे मोडक सागर धरण गेल्या वर्षी आजच्या दिवशी 100 टक्के भरले होते. पण आज या धरणात फक्त 40 टक्के पाणी साठा आहे. आज 16 मिमी पाऊस पडल्याची नोंद घेतली आहे. आठवड्यात फक्त तीन दशलक्ष घन मीटर पाणी साठा वाढला आहे. भातसा धरणात 52.94 टक्के पाणी साठा तयार झाला. गेल्या वर्षी तो 88 टक्के होता. या धरणात आज फक्त 2 मिमी पाऊस पडला आहे.  भातसात या आठवड्यात 38 दशलक्ष घनमीटर पाणी साठा वाढला आहे. तानसा धरणात आजपर्यंत फक्त 25 .47 टक्के पाणी साठा आहे. गेल्या वर्षी तो 99.38 टक्के होता. आठवड्यात दोन दशलक्ष घनमीटर पाणीसाठा वाढला आहे. तर आज 2 मिमी पाऊस पडला. मध्यवैतरणा धरणात आतापर्यंत 33.86 टक्के पाणी साठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी तो 93.94 टक्के होता. आज या धरणात सर्वाधिक 32 मिमी पाऊस पडला आहे. धरणांतील या चिंता जनक पाणी साठ्यामुळे काळजी वाढली आहे. आगामी दिवसात धरणांच्या या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Web Title: Rainfall in the catchment area between Mumbai-Thane dams; Disappointing water reserves in dams filled today last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.