Thane Rain: जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस, ठाणे शहर परिसरत झाडे पडून गाड्यांचे नुकसान; एक वाहून गेला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 08:10 PM2021-07-18T20:10:13+5:302021-07-18T20:10:54+5:30

Rain in Thane: जिल्ह्यात सरासरी ८१ मिमी पाऊस. गेल्या रात्री २.२२ वाजता मिनाताई ठाकरे चौक, आंबेडकर रोड, उथळसर येथील जिवन ओहाळ (३०) या हा तरुण वाहून गेल्याची घटना घडली.

rainfall in the Thane district, damage to vehicles due to falling trees in Thane city area; One drawned | Thane Rain: जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस, ठाणे शहर परिसरत झाडे पडून गाड्यांचे नुकसान; एक वाहून गेला

Thane Rain: जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस, ठाणे शहर परिसरत झाडे पडून गाड्यांचे नुकसान; एक वाहून गेला

Next

  लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात गेल्या  दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. उपनगरीय वाहतुकीचे वेळापत्रक पूर्ण पणे कोलमडले. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने प्रावश्यांचा फारसा उद्रेक दिसला नाही. तर ठाणे शहरात एक वाहून गेला असून दोन कंपाऊंडच्या भिंती पडल्या. तर काही झाडे फोरव्हीलर व दुचाक वाहनांवर उन्मळून पडले. खोपट बस डेपोसह अन्यही ठिकाणी शहरात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली. 

या पावसादरम्यान ठाणे शहरात ४७ मिमी पावसासह जिल्ह्यात गेल्या २४ तासात ८०.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या रात्री २.२२ वाजता मिनाताई ठाकरे चौक, आंबेडकर रोड, उथळसर येथील जिवन ओहाळ (३०) या हा तरुण वाहून गेल्याची घटना घडली असल्याचे कळले. पण जिल्हा आपत्ती आपत्ती व्यवस्थापन कक्षातील शुभांगी महाले यांना रविवारी संध्याकाळी ६.३० वाजता या विषयी 'कोठून‌ कसा वाहून गेला, या विषयीची माहिती विचारली असता त्या १२ तासानंतरही काही कळवू शकल्या नाही. काल उच्चही घटना काल ‌उडलेली असून नोंदवहीत अधीक माहिती काहीही दिली नाही, असे त्यांनी सांगितले.

         जिल्ह्यात सर्व तालुक्यात गेल्या २४ तासात सरासरी ८०.६ मिमी. पावसाची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. पण या दरम्यान ठाणे मनपाने कळवलेल्या माहिती नुसार एक तरुन पाण्यात वाहून गेल्याचे जिल्हा आपत्ती व नियंत्रण कक्षातील महाले यांनी सांगितले. शहरी भागासह ग्रामीण भागात दिवसभर पाऊस पडला. ठाणे जिल्ह्यात ८०.६ मिमी पाऊस २४ तासात पडला. या दरम्यान शहर परिसरात सरासरात संध्याकाळपर्यंत ४७.४७ मिमी.पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी या दिवशी ठाणे शहरा ७१ मिमी. पाऊस पडलेला होता. तर आज कल्याणला ७२.३ मिमी., मुरबाडला ६१ मिमी. तर भिवंडीला मिमी, शहापूरला ८४.५ मिमी पाऊस पडला आहे. उल्हासनगरला ७५.५ मिमी आणि अंबरनाथला सरासरी ९६.९ मिमी. पाऊस पडल्याची नोंद ठाणे जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. 

      ठाणे शहरातील दोन कंपाऊंड भिंत पडण्याची नोंद आहे. यामध्ये आनंद विहार कॉम्प्लेक्स, कळवा येथील रेल्वे क्रॉसिंग रोडजवळ, खारेगाव, पूर्वेस कंपाऊंड भिंत पडली.यासह  दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या कंपाऊंड भिंतीवर झाड पडले आणि खारतान येथील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे चार चाकी वाहने पार्क होती. त्याचे कमी,अधीक नुकसान झाली आहे. हिल व्ह्यू सोसायटी, उपवन तलावाजवळ, यूर रोड, उपवन, ठाणे (प) येथे झाड खाली पडले आहेत. याशिवाय धोकादायक स्थितीत असलेले झाडे व फांद्या तुटलेले झाडे आदींची नोंद झाली आहे. यात वागळे इस्टेट बस डेपोजवळ फांदी पडली आहे. येथील मातोश्री बंगल्याच्या कंपाऊंड वॉल, मेंटल हॉस्पिटल रोडवर झाडाची फांदी खाली पडली आहे. मोरेश्वर इमारतीजवळ टीएमसी शाळा, ढोकळी, येथे झाडाची फांदी रस्त्यावर कोसळली.
 

Web Title: rainfall in the Thane district, damage to vehicles due to falling trees in Thane city area; One drawned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.