पाऊस आला... ठाण्यात दहा तासात ७१.३६ मिमी पावसाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 10:52 PM2023-06-30T22:52:17+5:302023-06-30T22:53:13+5:30
गेल्या वर्षी याचदिवशी ३२३.०० मिमी नोंद झाली होती. त्यातच यंदा पाऊस उशिरा सुरू होऊन आणि यंदा अवकाळी पावसाने काही वेळा हजेरी लावली
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस ठाण्याला झोडपत असताना, शुक्रवारी सकाळी ९.३० वाजल्यापासून ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत म्हणजे दहा तासात ७१.३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अधूनमधून पडणाऱ्या पावसाने दुपारी अडीच ते साडेतीन या एक तासात सुमारे ३० मिमी जोरदार हजेरी लावली होती. तर गतवर्षापेक्षा यंदा दुप्पटीने पाऊस झाल्याचे आकडेवारी वरून दिसत आहे.
गेल्या वर्षी याचदिवशी ३२३.०० मिमी नोंद झाली होती. त्यातच यंदा पाऊस उशिरा सुरू होऊन आणि यंदा अवकाळी पावसाने काही वेळा हजेरी लावली. त्यातच गेल्या तीन ते चार दिवसात मुसळधार झालेल्या पावसाने ३० जूनच्या दुपारपर्यंत एकूण ६४५.३४ मिमी नोंद केली आहे. या आकडेवारी वरून दुप्पट पाऊस झाल्याचे दिसत आहे. शुक्रवारी सकाळीपासून पाऊस येऊन जाऊन होता. त्यातच दुपारी एक तासात पडलेल्या पावसाने दहा तासात ७१.३६ मिमी नोंद केली. याचदरम्यान झाडे आणि झाडांच्या फांदयातून तुटून पडल्या घटनांची नोंद झाली आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.