उठा उठा गांधी जयंती आली...एक(च) दिवस स्वच्छतेची वेळ झाली...!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 12:36 AM2017-10-03T00:36:00+5:302017-10-03T00:36:17+5:30

गांधी जयंतीचे औचित्य साधत ‘स्वच्छता हीच सेवा’, या घोषणेनुसार शासकीय कार्यालयांसह सर्व सामाजिक संस्था आणि संघटनादेखील सोमवारी स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरल्या होत्या.

Raised Gandhi Jayanti ... One (f) day was cleaned ... !! | उठा उठा गांधी जयंती आली...एक(च) दिवस स्वच्छतेची वेळ झाली...!!

उठा उठा गांधी जयंती आली...एक(च) दिवस स्वच्छतेची वेळ झाली...!!

Next

अंबरनाथ : गांधी जयंतीचे औचित्य साधत ‘स्वच्छता हीच सेवा’, या घोषणेनुसार शासकीय कार्यालयांसह सर्व सामाजिक संस्था आणि संघटनादेखील सोमवारी स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. श्री सदस्यांनी तब्बल २५ टन अतिरिक्त कचरा स्वच्छ करून मोहिमेत सर्वात मोठा वाटा उचलला. अंबरनाथ शहरात पालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. शहरात नियमित गोळा होणाºया कच-यापेक्षा २५ टन जास्त कचरा श्री सदस्यांनी संकलित केला. या स्वच्छता मोहिमेत आ. डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे, आरोग्य सभापती रवींद्र पाटील, निखिल वाळेकर यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले.

५९ किमी रस्त्यांची स्वच्छता
किन्हवली : शहापूर तालुक्यासह किन्हवली परिसरात श्री सदस्यांकडून स्वच्छता आभियान राबवण्यात आले. या वेळी ३२०० श्री सदस्यांनी तालुक्यातील ग्रामीण भागातील ५९ किमी रस्त्यांची स्वच्छता केली. या वेळी श्रीसदस्यांनी १९.४ टन ओला, तर ५०.६ टन सुका कचरा गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावली.

खर्डी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून खर्डीमध्ये महाराष्टÑभूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
या वेळी ग्रामपंचायत कार्यालयात गांधी जयंती साजरी करण्यात आली. त्या वेळी सरपंच भाग्यश्री डिगे, उपसरपंच सचिन जाधव, सदस्य असीफ शेख, माजी सरपंच प्रशांत खर्डीकर तसेच शेकडो श्रीसदस्य उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता अभियानाचे उद्घाटन करण्यात आले.
या अभियानांतर्गत ग्रामपंचायत कार्यालय परिसर, मुख्य बाजारपेठ, देवी मंदिर परिसर, वरची आळी, मराठी शाळा नं.-१ परिसर, खर्डीनाका, एमएसईबी, सरकारी दवाखाना परिसर ते रेल्वे स्टेशन बाजारपेठ अशा परिसरांत शेकडो श्रीसदस्यांनी स्वच्छता करून सुमारे ३२६९ किलो ओला, तर १७१५ किलो सुका कचरा जमा केला. या जमलेल्या कचºयाची योग्य विल्हेवाट लावल्याने गाव परिसर स्वच्छ दिसत होता.
या अभियानात २३० श्रीसदस्य, खर्डी हायस्कूलचे २६ विद्यार्थी, तर जीवनदीप महाविद्यालयातील १६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.


आसनगाव येथे स्वच्छता अभियान
शहापूर : कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे (के-३) प्रवासी संघटना, रेल्वे सुरक्षा दल व लोहमार्ग पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने मध्य रेल्वेच्या आसनगाव या स्थानकात महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

Web Title: Raised Gandhi Jayanti ... One (f) day was cleaned ... !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.