राज कुंद्रा धमकी प्रकरणी कोर्टात रंगले माफीनाटय

By admin | Published: May 20, 2017 02:13 PM2017-05-20T14:13:20+5:302017-05-20T14:13:20+5:30

अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांनी तक्रारदारास धमकावल्याचा मुद्दा शनिवारी पुन्हा उपस्थित झाला.

Raj Kundra mafnattayat in court in case of threat | राज कुंद्रा धमकी प्रकरणी कोर्टात रंगले माफीनाटय

राज कुंद्रा धमकी प्रकरणी कोर्टात रंगले माफीनाटय

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
ठाणे, दि. 20 - भिवंडीमध्ये दाखल झालेल्या एका फसवणुकीच्या प्रकरणात ठाणो न्यायालयात सुनावणी सुरू असताना अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांनी तक्रारदारास धमकावल्याचा मुद्दा शनिवारी पुन्हा उपस्थित झाला. यावेळी आरोपींपैकी एकाला न्यायालयासमोर तक्रारदाराची माफी मागावी लागली.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि त्यांचे पती राज कुंद्रा यांच्यासह बेस्ट डिल टीव्ही या होम शॉपिंग कंपनीच्या पाच संचालकांविरूद्ध भिवंडीतील कोनगाव पोलिसांनी गत महिन्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. भिवंडी येथील भलोटिया एक्सपोर्टने या शॉपिंग कंपनीला बेडशीटस्चा पुरवठा केला होता. या मालाच्या मोबदल्यापोटी सुमारे 24 लाख रुपये थकीत असून, या रकमेसाठी भलोटिया एक्सपोर्टचे रवी भलोटिया यांनी भिवंडीतील कोनगाव पोलीस ठाण्यात गत महिन्यात तक्रार दाखल केली होती. 
या गुन्ह्यामध्ये शिल्पा शेट्टी, त्यांचे पती राज कुंद्रा यांच्यासह बेस्ट डिल टीव्हीच्या पाच माजी संचालकांच्या अंतरिम जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी सुरू असताना, राज कुंद्रा यांनी आपणास भर न्यायालयात धमकावल्याचा आरोप रवी भलोटिया यांनी केला होता. या कृत्याबद्दल त्यांचे वकील अनिकेत निकम यांनी आरोपींच्या वतीने न्यायालयाची माफी मागितली होती. 
शनिवारी सकाळी 11 वाजता जामीन अर्जावर पुन्हा सुनावणी सुरु झाला. यावेळी तक्रारदाराच्या वकिलाने धमकीचा मुद्दा पुन्हा उपस्थित करून जामीन मंजुर करण्यास विरोध दर्शविला. अतिरिक्त सत्र न्यायाधिश संगिता खलिपे यांनी रवी भलोटिया यांना धमकीसंदर्भात विचारणा केली असता, त्यांनी न्यायालयास त्याबाबत माहिती दिली. यावेळी न्यायालयात आरोपी संचालकांपैकी एक, दर्शित शहा हे हजर होते. धमकीच्या प्रकाराबाबत न्यायालयाने त्यांना तक्रारदाराची माफी मागण्यास सांगितले. या आदेशानुसार दर्शित शहा यांनी रवी भलोटिया यांची माफी मागितली. आरोपींच्या जामिनावर न्यायालय दुपारनंतर निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Web Title: Raj Kundra mafnattayat in court in case of threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.