राज ठाकरे यांना खड्डे, वाहतूककोंडीचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 12:32 AM2019-09-08T00:32:06+5:302019-09-08T00:32:20+5:30
ठाकरे पुण्याहून तुलनेनी वेगात डोंबिवलीजवळ आले. मात्र शिळफाट्यावर त्यांना खड्ड्यांचा फटका बसला.
डोंबिवली : पुण्याहून डोंबिवलीत येताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिळफाटा येथील रस्त्याला पडलेले प्रचंड खड्डे व या परिसरातील वाहतूककोंडी याचा फटका बसला. रस्त्यात खड्डे बुजवत असलेल्या राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कामगारांना मनसेच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी झापले.
ठाकरे पुण्याहून तुलनेनी वेगात डोंबिवलीजवळ आले. मात्र शिळफाट्यावर त्यांना खड्ड्यांचा फटका बसला. एखाद्या होडीत बसल्यासारखी त्यांची अवस्था झाली. तेथील वाहतूककोंडीत ते अडकले. ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांकडे कडक शब्दांत नापसंती व्यक्त करताच पक्षाचे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी मोटारी रस्त्यात थांबवून खड्डे भरणाºया कामगारांना झापले.
मनसेचे माजी परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी त्यांना मिळालेले मानधन वेळोवेळी परिवहन कर्मचाऱ्यांना मुलांच्या शिक्षणाकरिता दिले आहे. शनिवारीही त्यांनी १५ हजारांचा धनादेश केडीएमटीचे बसवाहक मोहन खरंगळे यांना राज ठाकरे यांच्या हस्ते दिला.