राज ठाकरे ‘भगव्या’ खेळीच्या तयारीत? लवकरच भूमिका जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 11:13 PM2019-12-24T23:13:51+5:302019-12-24T23:14:20+5:30

बाळासाहेबांच्या जयंती दिनी महाअधिवेशनात नवीन भूमिका?

Raj Thackeray ready for 'saffron' game? | राज ठाकरे ‘भगव्या’ खेळीच्या तयारीत? लवकरच भूमिका जाहीर

राज ठाकरे ‘भगव्या’ खेळीच्या तयारीत? लवकरच भूमिका जाहीर

Next

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे येत्या काही दिवसांत हिंदुत्वाच्या राजकारणाकडे झुकण्याचे संकेत प्राप्त होत आहेत. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी २३ जानेवारी रोजी त्यांनी पक्षाचे पहिले महाअधिवेशन आयोजित केले असून ‘येथून नव्या स्वरुपातील राज ठाकरे तुम्हाला दिसेल’, अशा शब्दांत त्यांनी पदाधिकाऱ्यांना नव्या राजकीय भूमिकेचे संकेत अलीकडेच दिले आहेत. शिवसेनेनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केल्याने दुखावलेला शिवसेनेचा कट्टर हिंदुत्ववादी मतदार मनसेकडे खेचण्याची व येत्या महापालिका निवडणुकीत मनसेची ताकद वाढवायची, अशी त्यांची रणनीती आहे.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक अलीकडेच पुण्यात झाली. त्यावेळी पदाधिकाºयांनी राज ठाकरे यांना ‘आपला शत्रू कोण’, असा सवाल केला. एकेकाळी आपण नरेंद्र मोदी व भाजपची स्तुती केली. तर लोकसभा निवडणुकीत आपण मोदी व भाजपला विरोध केला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आपण घेतलेल्या भाजपविरोधी भूमिकेचा राष्ट्रवादी काँग्रेसला लाभ झाला. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीने सेनेबरोबर सत्ता स्थापन केली. तर मनसेला काहीच फायदा झाला नाही. येत्या महापालिका निवडणुकीत आपला शत्रू कोण ते जाहीर करा, अशी आग्रही मागणी पदाधिकाºयांनी केली. शिवसेनेच्या सत्तेमुळे त्यांचा हिंदुत्ववादी मतदार अवस्थ असल्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर राज यांनी वरील घोषणा केली.

शक्तीप्रदर्शनाची तयारी
मनसेने आपल्या १३ वर्षांच्या वाटचालीत आजपर्यंत एकही महाअधिवेशन आयोजित केलेले नाही. गोरेगाव येथील नॅस्को मैदानावर होणाºया या महाअधिवेशनाच्यानिमित्ताने मनसे एका मोठ्या शक्तीप्रदर्शनाच्या तयारीत आहे. मनसे यावेळी कोणती भूमिका घेते, याकडे सत्ताधारी शिवसेनेबरोबरच विरोधी भाजपचेही लक्ष लागले आहे.

शिवस्मारकाला विरोध नको; पदाधिकाºयांची भूमिका
राज ठाकरे यांनी शिवस्मारकाला केलेल्या विरोधाबाबत बैठकीत चर्चा झाली. पक्षाच्या या भूमिकेमुळे मूठभर पर्यावरणवादी खूष होत असले तरी ग्रामीण भागातील शेकडो मराठा समाजातील कार्यकर्ते तसेच शिवप्रेमी नाराज होतात. त्यामुळे काही संवेदनशील विषयांवर तुम्हाला असत्य बोलणे शक्य नसेल तरी सत्य बोलू नका, अशी भूमिका काही पदाधिकाºयांनी मांडली.

Web Title: Raj Thackeray ready for 'saffron' game?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.