राजेंद्र पाटील ठाणे जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे नवे अध्यक्ष
By Admin | Published: May 2, 2017 01:44 AM2017-05-02T01:44:55+5:302017-05-02T01:44:55+5:30
महाराष्ट्र राज्यात सहकारी क्षेत्रात दोन नंबरवर असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बैंकेची धुरा वसई ग्रामीण भागातील सायवन गावातील
पारोळ : महाराष्ट्र राज्यात सहकारी क्षेत्रात दोन नंबरवर असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बैंकेची धुरा वसई ग्रामीण भागातील सायवन गावातील राजेंद्र गोपाळ पाटील यांच्या खांद्यावर बहुजन विकास आघाडी ने देऊन ५९ वर्षा नंतर नेतृत्व करण्याची संधी वसई ग्रामीण भागाला मिळाली असल्याने या भागातील बहुजन विकास आघाडी च्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन मेढेफाटा येथे केले होते.
या प्रसंगी आ विलास तरे, माजी खा. बलिराम जाधव, माजी महापौर नारायण मानकर, उपमहापौर उमेश नाईक, नगर सेवक सुनील आचोलकर, राजेश पाटील, प्रकाश पाटील, प्रणय कासार आदी मान्यवर या कार्यक्र माला हजर होते. पाटील हे सामान्य शेतकरी असताना ही त्यांनी सहकारक्षेत्रात उडी घेत सायवन सेवा सोसायटी संच, सहकारी भात गिरणी शिवणसई, कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे संचालक पदावर त्यांनी उत्तम कामिगरी केल्याने त्यांची बिनविरोध निवड ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंके वर करण्यात आली. आठ वर्ष या पदावर असताना त्यांनी भरीव कामिगरी केल्याने या बैंकचे अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्या वर सोपविण्यात आली आहे. (वार्ताहर)