ठाणे पूर्वेकडील सॅटीसला मिळणार चालना, राकेश गोयल यांनी प्रकल्पाच्या आराखड्यातील योजनांना दिली तत्वत: मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 03:26 PM2017-10-28T15:26:58+5:302017-10-28T15:30:37+5:30

ठाणे पूर्वेची कोंडी येत्या काळात फुटणार आहे. पूर्वेलाही सॅटीस प्रकल्प सुरु करण्याचा पालिकेचा मानस असून त्यासाठी २६५ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला असून, रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष राकेशगोयल यांनी या प्रकल्पाच्या आराखड्यास तत्वत: मान्यता दिली आहे.

Rakeysh Goyal approves plans for the project in Thane | ठाणे पूर्वेकडील सॅटीसला मिळणार चालना, राकेश गोयल यांनी प्रकल्पाच्या आराखड्यातील योजनांना दिली तत्वत: मान्यता

ठाणे पूर्वेकडील सॅटीसला मिळणार चालना, राकेश गोयल यांनी प्रकल्पाच्या आराखड्यातील योजनांना दिली तत्वत: मान्यता

Next
ठळक मुद्देपूर्वेकडील सॅटीससाठी केला जाणार २६५ कोटींचा खर्चरेल्वेच्या १० हजार चौरस मीटर जागेवर १२ मीटरच्या वरील जागेचा व्यावसायीक वापरइस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील कोपरी पुलापासून जो तीन किमी लांबीचा रस्ता स्टेशनपर्यंत येतो तेवढा फ्लाय ओव्हर केला जाणार

ठाणे - मनोरुग्णालयाजवळील नवीन रेल्वे स्टेशनला गती मिळत असतांनाच आता ठाणे पूर्वेकडील सॅटीस प्रकल्प देखील मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या प्रकल्पासाठी २६५ कोटींची खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यानुसार रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाचे (आरएलडीए) उपाध्यक्ष राकेश गोयल यांनी या प्रकल्पाचा आराखडा पाहिल्यानंतर योजनांना तत्वत: मंजूरी दिली असून सविस्तर प्रस्तावानंतर तातडीने रितसर मंजूरी देण्याचे अश्वासन त्यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांना शुक्र वारी दिले.
ठाणे पश्चिमेकडील सॅटीस प्रकल्पापाठोपाठ पूर्वेकडे देखील सॅटीस उभारण्याच्या हालचाली पालिकेने सुरु केल्या आहेत. त्यानुसार शुक्र वारी सांयकाळी राकेश गोयल हे ठाणे महापालिका मुख्यालयात दाखल झाले होते. त्यावेळी सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पालिकेच्या अधिकाºयांनी ठाणे पुर्वेतील स्टेशन परिसर सुधारणा कार्यक्र माचा आराखडा आणि एक प्रेझेंटेशनही सादर केले. ठाणे स्टेशन परिसराभोवतालची गर्दी आणि त्याच्या भविष्यातील नियोजनासाठी या प्रकल्पाची असरणारी गरज गोयल यांच्यासमोर मांडण्यात आली. त्यानुसार या आराखड्याला तत्वत: मंजुरी दिली आहे. तसेच हा प्रकल्प सुकर करण्याचे आश्वासनही त्यांनी दिल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. पूर्वेकडील बाजूस ११ हजार १०० चौसर मीटर जागा असून त्यापैकी १० हजार चौ. मी. जागा रेल्वेची असून ११०० चा.ैमी. जागेवर रस्ता आहे. इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील कोपरी पुलापासून जो तीन किमी लांबीचा रस्ता स्टेशनपर्यंत येतो तेवढा फ्लाय ओव्हर केला जाणार आहे. त्याशिवाय स्टेशनमोरील जागेवर पश्चिमेच्या धर्तीवर ६ मीटर उंचीचा एक डेक उभारला जाणार असून वरील बाजूस टीएमटी, एसटी आणि बेस्टच्या बसेसचे थांबे असतील. तर, तळमजल्यावर रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. या जागेवर प्रशस्त पार्कींग प्लाझाही उभारण्याचे नियोजन आहे. रेल्वेच्या १० हजार चौरस मीटर जागेवर १२ मीटरच्या वरील जागेचा व्यावसायीक वापर रेल्वेला करू दिला जाणार आहे. या योजनेसाठी तीन एफएसआय मंजूर झाल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. कोपरी पुलाच्या बाजूला पार्कींगसाठी आरक्षण व फुड कोर्पोरेशन इंडियाच्या जागेवर बस टर्मिनल बांधण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी पालिकेने गार्डन आणि गोडाऊनचे आरक्षण बदलांचा प्रस्ताव मंजुर झाला असून तो अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. एकूणच येत्या काही वर्षात ठाणे पूर्वेतील कोंडी फुटणार असल्याचे पालिकेच्या या नियोजनावरुन स्पष्ट होत आहे.



 

Web Title: Rakeysh Goyal approves plans for the project in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.