पेंढरी पाडा शाळेच्या विद्यार्थ्यांकडून कोरोना योद्ध्यांसाठी राख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:42 AM2021-08-22T04:42:35+5:302021-08-22T04:42:35+5:30
वज्रेश्वरी - कोरोना कालावधीत आपले कर्तव्य बजावणाऱ्या कोरोना योद्ध्यांसाठी भिवंडी तालुक्यातील पेंढरी पाडा या आदिवासीबहुल शाळेतील मुलांनी पर्यावरणपूरक ...
वज्रेश्वरी - कोरोना कालावधीत आपले कर्तव्य बजावणाऱ्या कोरोना योद्ध्यांसाठी भिवंडी तालुक्यातील पेंढरी पाडा या आदिवासीबहुल शाळेतील मुलांनी पर्यावरणपूरक राख्या बनवून त्यांना सुपूर्द केल्या आहेत.
नेहमीच आगळेवेगळे उपक्रम करत असलेल्या पेंढरी पाडा या शाळेतील मुलांनी महेश बांगर या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक अशा राख्या स्वतःच्या हातून बनवल्या. त्या राख्या ग्रामीण रुग्णालय, अंबाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, वज्रेश्वरी, ग्रामपंचायत, अकलोली आणि गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, भिवंडी येथील कोरोना योद्ध्यांसाठी देऊन त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या या उपक्रमासाठी अकलोली ग्रामपंचायतीचे सरपंच रामकृष्ण रावते यांनी सहकार्य केले. यावेळी मुलांना मुख्याध्यापक संजय कापसे यांनी कोरोना योद्ध्यांनी त्या कालावधीत कशाप्रकारे समाजाची सेवा केली, याचे महत्त्व समजावून सांगितले. मुलांनी मास्क लावून आणि सोशल डिस्टन्सिंगचे योग्य पालन करून उपक्रम राबविला.