सुरक्षित प्रवासाची सेवा देणाऱ्या उपनगरी रेल्वेच्या मोटरमनला राखी बांधून ठाण्यात रक्षाबंधन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 05:58 PM2021-08-22T17:58:52+5:302021-08-22T17:59:50+5:30

कोरोना आपत्ती असो की मुसळधार पाऊस अशा कोणत्याही संकटात कामावर तत्परतेने हजर राहून कर्तव्य बजावित लाखो महिलांना सुरक्षित प्रवासाची सेवा देणाºया लोकलच्या अर्थात उपनगरी रेल्वेच्या मोटरमनला महिलांनी राखी बांधून रविवारी रक्षाबंधन साजरे केले.

Rakshabandhan in Thane by tying rakhi to the motorman of suburban railway providing safe travel service | सुरक्षित प्रवासाची सेवा देणाऱ्या उपनगरी रेल्वेच्या मोटरमनला राखी बांधून ठाण्यात रक्षाबंधन

सुरक्षित प्रवासाची सेवा देणाऱ्या उपनगरी रेल्वेच्या मोटरमनला राखी बांधून ठाण्यात रक्षाबंधन

Next
ठळक मुद्दे विश्वास सामाजिक संस्थेचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोना आपत्ती असो की मुसळधार पाऊस अशा कोणत्याही संकटात कामावर तत्परतेने हजर राहून कर्तव्य बजावित लाखो महिलांना सुरक्षित प्रवासाची सेवा देणाºया लोकलच्या अर्थात उपनगरी रेल्वेच्या मोटरमनला महिलांनी राखी बांधून रविवारी रक्षाबंधन साजरे केले. ठाण्यातील विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तसेच भाजपाचे जेष्ठ नगरसेवक संजय वाघुले आणि त्यांची कन्या वृषाली वाघुले यांनी हा नाविन्यपूर्ण उपक्र म राबविला.
लाखो चाकरमानी महिला लोकलने प्रवास करतात. सध्या कोरोनामुळे महिला प्रवाशांची संख्या तुलनेने कमी आहे. परंतू, कोणत्याही आपत्तीमध्ये मोटरमन (उपनगरी रेल्वेचे चालक) कर्तव्यावर हजर राहून आपले कर्तव्य चोख बजावत असतात. त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करण्याबरोबरच एक भाऊ म्हणून महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी मदत करणाºया मोटरमन्सला राख्या बांधण्यात आल्या. नगरसेवक संजय वाघुले तसेच त्यांची कन्या वृषाली यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या पदाधिकारी विशाखा कणकोस, सई कारु ळकर, राणी क्षीरसागर आणि शीतल अंदुरे यांनी हा उपक्र म राबविला. सध्या कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या तसेच धकाधकीच्या जीवनात सुरक्षित प्रवास अत्यंत महत्वाचा आहे. दररोजच्या वाहतूक कोंडीपेक्षा ठाणेकरांना लोकल प्रवास नेहमीच पसंतीला असतो. त्यात मोटरमन्स हा महत्वाचा दुवा आहे. प्रत्येक नोकरदार महिलेसाठी मोटरमन हे बंधूतुल्य आहेत. याच भावनेतून राखीपोर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा हा उपक्रम राबविल्याची प्रतिक्रिया वृषाली यांनी व्यक्त केली.

Web Title: Rakshabandhan in Thane by tying rakhi to the motorman of suburban railway providing safe travel service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.