तळीये दुर्घटनेत एकटीच बचावलेल्या पूजाला रक्षाबंधनाची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:44 AM2021-08-24T04:44:58+5:302021-08-24T04:44:58+5:30

भिवंडी : एक महिन्यापूर्वी महाड तालुक्यातील तळीये गावात झालेल्या दुर्घटनेत डोंगर कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे ८४ गावकऱ्यांचा बळी गेला. ...

Rakshabandhan's gift to Pooja, the only survivor of the Taliye tragedy | तळीये दुर्घटनेत एकटीच बचावलेल्या पूजाला रक्षाबंधनाची भेट

तळीये दुर्घटनेत एकटीच बचावलेल्या पूजाला रक्षाबंधनाची भेट

Next

भिवंडी : एक महिन्यापूर्वी महाड तालुक्यातील तळीये गावात झालेल्या दुर्घटनेत डोंगर कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे ८४ गावकऱ्यांचा बळी गेला. याच गावातील २३ वर्षीय पूजा कोंडलेकरच्या कुटुंबातील सर्वांचा बळी जाऊन ती एकटीच वाचली. तिच्या शिक्षण, पालनपोषणासह विवाहाची जबाबदारी घेऊन भिवंडीतील भावांनी रक्षाबंधनाच्या दिवशी तिच्याकडून राखी बांधून घेतली. पूजाला दुःखाच्या डोंगरातून सुखाची नवीन वाट दाखवत भिवंडीतील भावांनी आधार दिल्याने तिच्याशी जिव्हाळ्याचं नवीन नातं जुळलं असून, भिवंडीतील तरुण प्रदीप शेट्टी याने पूजाची सर्व जबाबदारी स्वीकारून रक्षाबंधनाची अनोखी भेट दिली आहे.

एक महिन्यापूर्वी कोकणात पावसाने हाहा:कार माजवून अनेकांचे बळी घेतले. त्यानंतर मानवतेच्या दृष्टीने राज्यभरातून शेकडो सामाजिक संघटनांनी कोकणात मदतीचा ओघ सुरू केला. काहींनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. यामध्ये भिवंडीतील साई फाउंडेशनच्या ५० कार्यकर्त्यांनी चिपळूणसह आजूबाजूच्या दुर्घटनाग्रस्त गावांना भेटी देत, त्यांना अन्नधान्य व संसारोपयोगी साहित्य देऊन मदत केली. शिवाय त्यांच्या घरांची दुरुस्ती व साफसफाई करीत श्रमदानही केले होते.

महाड तालुक्यातील तळीये गावावर डोंगराचा मोठा भाग कोसळला होता. त्यामुळे काही लोक दरडीखाली जागीच दबले गेले, तर काही दरडीबरोबर वाहत गेले. अनेकांच्या अंगावर आणि घरांवर दरडीसोबत आलेले दगड पडले, झाडे पडली, मातीचा ढिगारा पडला. जेवढे डोंगराच्या आडोशाला उभे होते, त्यातील एकही बचावला नाही. या गावातील ३५ घरेही जमीनदोस्त झाली. त्यामध्ये पूजाचेही घर होते. २० दिवसांनी साई फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप शेट्टी यांना गावकऱ्यांनी संपर्क करून मदत मागितली. त्यावेळी पूजाची व्यथा त्यांच्यासमोर आल्याने त्यांनी पूजाशी बहिणीचं नातं निर्माण करून तिची संपूर्ण जबाबदारी घेऊन खऱ्या अर्थाने रक्षाबंधन साजरा केला.

Web Title: Rakshabandhan's gift to Pooja, the only survivor of the Taliye tragedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.