राम गणेश गडकरी रंगायतनची होणार दुरुस्ती, फेब्रुवारी पासून कामाला सुरवात

By अजित मांडके | Published: January 24, 2024 03:50 PM2024-01-24T15:50:02+5:302024-01-24T15:50:50+5:30

राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहातील नुतणीकरणाचे काम आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

Ram Ganesh Gadkari Rangayatan will be repaired work will start from February | राम गणेश गडकरी रंगायतनची होणार दुरुस्ती, फेब्रुवारी पासून कामाला सुरवात

राम गणेश गडकरी रंगायतनची होणार दुरुस्ती, फेब्रुवारी पासून कामाला सुरवात

ठाणे : ठाणे शहराची ओळख मानल्या जाणाऱ्या आणि नाट्यकर्मी व नाट्य रसिकांची पहिली पसंती असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहातील नुतणीकरणाचे काम आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यानुसार गडकरी रंगायतनचा पडदा बदलण्यापासून ते बाहेरील लुक देखील बदलला जाणार आहे. यासाठी ८ कोटींचा निधी मंजुर झाला आहे.  

काही महिन्यांपूर्वी गडकरी रंगायतनचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले होते. त्यात, मूळ वास्तू सुस्थितीत असून अंतर्गत रचना आणि सुविधा यात आमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले. त्याप्रमाणे, गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने राज्य सरकारकडे दिला होता. त्यास मंजुरी मिळाली असून त्यासाठी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला झाला आहे. १९७८ मध्ये बांधण्यात आलेल्या रंगायतनची २००५ मध्ये मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता १८ वर्षांनी नुतनीकरण होत आहे. रंगायतनची आसनक्षमता १०८० एवढी आहे. गडकरी रंगायतनमधील सुधारणा करताना रंगायतनचे पारंपरिकपण जपले जाईल. तसेच, काळानुरुप अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. कलाकार आणि रसिक या दोघांनाही सुखद अनुभव मिळेल, हा उद्देश नजरेसमोर ठेवून रंगायतनचे नूतनीकरण केले जाणार असल्याचे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.

गडकरी रंगायतनचे नूतनीकरण करताना कलाकार आणि प्रेक्षक यांच्या अपेक्षा समजून त्यानुसार अंतर्गत सुविधांची रचना केली जाणार आहेत. त्यात प्रामुख्याने, मुख्य वास्तूचे मजबुतीकरण, तालीम हॉलचे नुतनीकरण, मुख्य प्रेक्षागृहातील संपूर्ण आसनव्यवस्था बदलणे, रंगकर्मी यांच्यासाठी असलेल्या ग्रीन रूममध्ये आवश्यक सुधारणा, रंगमंच-फ्लोरिंग अद्ययावत करणे, वातानुकूलन यंत्रणेत सुधारणा,  शौचालयांचे संपूर्ण अद्यावतीकरण आदी कामांचा समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले. रंगायतनच्या तारखांचे बुकिंग लक्षात घेवून नूतनीकरण कामे केली जाणार आहेत. त्यातही येथील ऐतिहासीक असलेला पडदा देखील आता बदलला जाणार आहे. याशिवाय येथे येणाऱ्या जेष्ठ नागरीकांसाठी रॅम्प किंवा लिफ्टचा विचार सुरु झाला असून तो अंतिम टप्यात आहे. त्यामुळे येण्या जाणाऱ्यांसाठी रंगायतनमध्ये जाण्यास सोईचे होणार आहे.

संपूर्ण रंगरंगोटी, स्ट्रक्चरल सुधारणा, आवश्यक स्थापत्य कामे, प्लिंथ प्रोटेक्शन, नवीन आसनव्यवस्था, रंगमंच, पडदा, फ्लोरिंग, विंग्स यांचे नुतनीकरण, पार्किंग व्यवस्था सुधारणा, फॉल सिलिंगचे काम, तालीम हॉलचे नुतनीकरण, अग्निसुरक्षा व्यवस्था नुतनीकरण, शौचालयांचे नुतनीकरण आदींचा समावेश आहे.

Web Title: Ram Ganesh Gadkari Rangayatan will be repaired work will start from February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे