उल्हासनगरातून राम जन्मभूमी समर्पण निधी, २५ लाखाचे टार्गेट, भाजपचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 06:50 PM2021-02-09T18:50:40+5:302021-02-09T18:51:44+5:30
उल्हासनगरात मोठ्या संख्येने सिंधी समाज राहत असून राममंदिर उभारणीला सिंधी समाज व शहरातून सर्वाधिक निधी जमा होण्यासाठी शहर भाजपने कंबर कसली. भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, आमदार कुमार आयलानी, पक्ष प्रवक्ता मनोज लासी यांच्यासह पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी दररोज मार्केट मधून राम मंदिर उभारणी साठी समर्पण निधी जमा करीत आहेत.
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहर भाजपच्या वतीने अयोध्या राम मंदिर उभारणीसाठी समर्पण निधी जमा करण्यात येत असून १५ फेब्रुवारी पर्यंत २५ लाखाचे टार्गेट असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ता व नगरसेवक मनोज लासी यांनीं दिली. गेल्या महिन्यात सिंधी समाजाकडून २११ किलो वजनाच्या एकूण २११ विटा देण्यात आल्या. मात्र यावरून शहर भाजपातील वाद चव्हाट्यावर आला.
उल्हासनगरात मोठ्या संख्येने सिंधी समाज राहत असून राममंदिर उभारणीला सिंधी समाज व शहरातून सर्वाधिक निधी जमा होण्यासाठी शहर भाजपने कंबर कसली. भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, आमदार कुमार आयलानी, पक्ष प्रवक्ता मनोज लासी यांच्यासह पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी दररोज मार्केट मधून राम मंदिर उभारणी साठी समर्पण निधी जमा करीत आहेत. १५ फेब्रुवारी पर्यंत २५ लाखाचा निधी जमा करण्याचे पक्षाचे टार्गेट असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ता मनोज लासी यांनी दिली. नागरिकांचा प्रतिसाद मोट्या प्रमाणात मिळत असून लवकरच टार्गेट पूर्ण करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या महिन्यात सिंधी समाजाच्या वतीने रामभूमी उभारणीसाठी तब्बल २११ किलो वजनाच्या २११ विटा जन्मभूमी शिला न्यासचे संचालक यांच्याकडे देण्यात आले. यावेळी प्रमुख म्हणून आमदार कुमार आयलानी उपस्थित होते.
शहर भाजपात चांदीच्या विटा देण्यावरून दोन गट पडून भाजपातील वाद चव्हाट्यावर आला. भाजपचे वरिष्ठ नेते व नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी जगात सर्वाधिक संख्येने सिंधी समाज उल्हासनगरात राहतो. रामजन्मभूमीला देण्यात आलेल्या २११ विटा पैकी फक्त २ विटा शहरातील आहे. हे शहरातील सिंधी समाजाला भूषणावह नाही. अशी टीका आमदार कुमार आयलानी यांच्यावर अप्रत्यक्ष रामचंदानी यांनी केली होती. तसेच शहरातून सर्वाधिक निधी गोळा करण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे संकेत दिले. दरम्यान रामचंदानी यांनी रामभूमी समर्थक १५० जणांना शिर्डीचे दर्शन घडवून आणले. प्रदीप रामचंदानी यांच्या सक्रियेतेमुळे आमदार कुमार आयलानी यांनी समर्थकांसह शहरातून समर्पण निधी जमा कारण्याचे सुरू केले.
२५ लाखाचे टार्गेट पूर्ण होणार?
शहर भाजपने रामजन्मभूमी मंदीराच्या उभारणीसाठी कंबर कसून समर्पण निधी गोळा करण्यास सुरुवात केली. भाजपने २५ लाखाच्या निधीचे टार्गेट ठेवले असून काही दिवसात टार्गेट पेक्षा जास्त निधी जमा होणार असल्याची प्रतिक्रिया पक्ष प्रवक्ते व नगरसेवक मनोज लासी यांनी दिली. या निमित्ताने शहर भाजपातील वादही उफाळून आला आहे. उल्हासनगर की मशहूर बाजार जापानी बाजार में श्री राम मंदिर समर्पण निधि कार्यक्रम के तहत उल्हासनगर के भाजपाइयों को जापानी बाजार के धानवीर व्यापारियों ने दिल खोलकर अपना सहयोग दिया.