अखंड वीजपुरवठ्यासाठी रमजानमध्ये सुट्या रद्द
By admin | Published: June 1, 2017 05:09 AM2017-06-01T05:09:18+5:302017-06-01T05:09:18+5:30
पावसाळा व रमजान काळात वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणतर्फे योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. यासाठी ठाणे मंडळातील
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पावसाळा व रमजान काळात वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणतर्फे योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. यासाठी ठाणे मंडळातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या असून त्यांना मुख्यालयी राहण्यास सांगितले आहे. याचबरोबर एक जबाबदार अभियंता सायंकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत भारत गिअर कार्यालयातील विशेष कक्षातून लक्ष ठेवणार आहे. तसेच उच्चदाब वाहिनीतील होणारा बिघाड त्वरित दुरु स्त करण्यास आठ कामगारांचे पथक तैनात केले असून वीजचोरांवर भरारी पथकाचा वॉच राहणार असल्याचे महावितरणने कळवले आहे.
महावितरणच्या ठाणे मंडळांतर्गत शीळ व मुंब्रा या उपविभागांचा समावेश होत असून या भागांतील काही ग्राहकांद्वारे वेळी-अवेळी अनधिकृत पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या वीजजोडणीमुळे या परिसरातील वीज वितरण व्यवस्थेवर परिणाम होत आहे. या अनधिकृत जोडणीमुळे उच्चदाब वाहिनी अतिभारित (ओव्हरलोड) होऊन बंद होतात. तसेच वीज वितरण व्यवस्थेवर ताण आल्याने फिडर ट्रीप होतात. त्यामुळे अनधिकृत वीजपुरवठा घेणाऱ्यांवर महावितरणचे भरारी पथक लक्ष ठेवणार आहे. तसेच, त्यामुळेच ग्राहकांनी अनधिकृत वीजपुरवठा घेऊ नये, असे आवाहनदेखील महावितरणमार्फत करण्यात येत आहे.
वीजचोरी रोखण्यास महावितरण नेहमीच प्रयत्नशील आहे. परंतु, लोकांनी सहकार्य केल्यास ग्राहकांना अधिकाधिक गुणवत्तापूर्ण सेवा देणे शक्य होईल. सध्या रमजान महिन्यास सुरुवात झाली असून या काळात मुस्लिम बांधवांना अखंड वीजपुरवठा करण्यास महावितरण बांधील आहे. याकरिता, येणारा पावसाळा व रमजान महिना यांच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा व शीळ उपविभागांतील सर्व उच्चदाब व लघुदाब वाहिन्यांची देखभाल व दुरु स्तीची सर्व कामे करून घेतली आहेत. उच्चदाब वाहिनी अतिभारित (ओव्हरलोड) होऊ नये म्हणून ग्राहकांनी संध्याकाळी ६ ते रात्री १० या