मुरबाड ग्रामीण रूग्णालयाचा कारभार ‘रामभरोसे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:00 AM2019-06-13T00:00:03+5:302019-06-13T00:00:33+5:30
सात डॉक्टरांची जबाबदारी एकावर : प्रसूतीसाठी जावे लागत आहे खाजगी रूग्णालयात
मुरबाड : तालुक्यातील प्रशासनाला पावसाच्या आगमनाची चाहुल लागल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्कठेवण्यात आली असली तरी मुरबाड ग्रामीण रूग्णालयाचा कारभार मात्र रामभरोसे सुरू आहे. येथे कार्यरत असणाऱ्या सात डॉक्टरांपैकी केवळ एकच डॉक्टर असल्याने किरकोळ आजार असणाºया रूग्णांना व प्रसूतीसाठी येणाºया महिलांना खाजगी रूग्णालयाचा रस्ता दाखवला जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मुरबाड ग्रामीण रूग्णालयात नागरिकांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्यात म्हणून सरकारने या रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा देऊन त्याठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरही सुरू करण्यात आले. रूग्णालयात येणाºया रूग्णांना तात्काळ उपचार मिळावेत म्हणून त्याठिकाणी सुमारे सात डॉक्टरांची नियुक्ती केली असून त्या ठिकाणी तातडीची शस्त्रक्रिया तसेच आॅक्सिजनचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्रामीण रूग्णालयाच्या दुरूस्तीचे काम फेब्रुवारीपासून सुरू असल्यामुळे या रूग्णालयात ओपीडी आणि प्रसूती कक्षा व्यतिरिक्त सर्वच विभाग बंद आहे. तालुक्यातील नागरिकांना थंडी, ताप ,कावीळ तसेच दूषित पाण्यामुळेही विविध प्रकारच्या आजाराची लागण होत आहे. प्रत्येक रूग्ण हा प्राथमिक उपचार घेण्यासाठी जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी जात असला तरी त्याठिकाणी त्याला काही सुविधा अभांवी योग्य उपचार मिळत नसल्यामुळे तो थेट ग्रामीण रु ग्णालयाचा रस्ता धरतो. परंतु तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने तो किरकोळ उपचारासाठी खाजगी दवाखान्याचे महागडे उपचार घेतो. त्यामुळे सरकारची मोफत आरोग्य सेवा ही नागरिकांना मिळेनाशी झाली असल्याने मुरबाड रु ग्णालय हे बंद होण्याच्या मार्गावर असल्याने आरोग्य विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे. सरकारने डॉक्टरांना मुख्यालयात वास्तव्य करणे हे सक्तीचे केलेले असतानाही येथे सातपैकी एकच डॉक्टर रूग्णालय चालवत असल्यामुळे इतर डॉक्टर हे घर बसल्या सरकारचा पगार घेत असल्यामुळे त्यांच्यावर वरिष्ठांचा अंकुश नसल्याचे स्पष्ट होते.
रु ग्णालयात शस्त्रक्रिया विभाग आणि गर्भपात केंद्र सुरू करण्यात आले असले तरी दररोज किमान चार ते पाच गर्भपात होतात. त्याची आकडेवारी किंवा नोंद देण्यास रूग्णालय प्रशासन टाळाटाळ करत असून हे गर्भपात केंद्रही संशयाच्या भोवºयात सापडले आहे.
मुरबाड ग्रामीण रूग्णालयात रु ग्णांची गैरसोय होत असेल तर त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल.
- कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक