‘एलईडी’च्या निविदेतून उधळपट्टी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:13 AM2019-12-20T00:13:18+5:302019-12-20T00:14:49+5:30

स्मार्ट सिटी योजना : निविदेस स्थगिती देण्याची नगरसेवकाची मागणी

Rampage from 'LED' tender? | ‘एलईडी’च्या निविदेतून उधळपट्टी?

‘एलईडी’च्या निविदेतून उधळपट्टी?

Next

कल्याण : केडीएमसी हद्दीत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत बसवलेले पथदिवे बदलून त्याऐवजी एलईडी दिवे लावण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत निविदा मागवण्यात आली आहे. ही निविदा नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करणारी असल्याने त्याला स्थगिती देण्याची मागणी शिवसेना नगरसेवकाने केली आहे.


महापालिका हद्दीत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत तसेच नव्याने विकसित झालेल्या ठिकाणी सहा हजार २५२ पथदिवे बसवले आहेत. या पथदिव्यांचा अहवाल स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी स्थापन केलेल्या कंपनीच्या नोडल अधिकाऱ्यास दिला आहे. मात्र, स्मार्ट सिटीत एलईडी पथदिवे बसविताना यापूर्वी लावलेल्या दिव्यांची संख्या वगळून अन्य ठिकाणी लावण्यात येणाºया पथदिव्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे अपेक्षित होते. परंतु, आधी लावलेले पथदिवे न वगळता त्यांच्यासह स्मार्ट सिटी प्रकल्प कंपनीने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे.


राज्य सरकार व महापालिका निधीतून लावलेल्या पथ दिव्यांना लावून दोन ते सहा वर्षे झालेली आहेत. ते बदलून नवे एलईडी दिवे लावण्याचा घाट स्मार्ट सिटीअंतर्गत घातला गेला आहे. त्यासाठी निविदा मागवली आहे. त्यामुळे आधी खर्च केलेला निधी वाया जाणार असल्याने हे नागरिकांचे आणि महापालिकेचे नुकसान आहे.


स्मार्ट सिटीतर्फे नोव्हेंबर २०१९ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर १६० एलईडी दिवे बसवून त्यांची कार्यक्षमता सहा महिने कालावधीसाठी तपासली जाणार होती. या दिव्यांची कार्यक्षमता उत्तम असल्याचे आढळल्यास त्याचा विचार केला जाईल, असे म्हटले होते. मात्र, या दिव्यांतून चांगला प्रकाश मिळत आहे. असे असताना हे दिवे बदलण्याचे स्मार्ट प्रयोजन काय, असा सवाल शिवसेनेचे नगरसेवक सचिन बासरे यांनी केला आहे. एलईडी दिव्यांच्या निविदेस स्थगिती देण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर या दिव्यांतून ५० टक्के वीजबचत होणार असल्याचा दावा केला जात असला, तरी त्याद्वारे वीजबचत झाली नाही तर संबंधित कंत्राटदाराकडून त्याची वसुली करून त्याच्याविरोधात काय कारवाई केली जाईल, याचा उल्लेख निविदेत दिसून येत नाही, याकडे बासरे यांनी लक्ष वेधले आहे.


स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची बैठक अद्याप झालेली नाही. महापालिका आयुक्त गोविंद बोडके हे मसुरी येथे प्रशासकीय प्रशिक्षणासाठी गेले आहेत. त्याचबरोबर नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या संचालक मंडळाची बैठक जानेवारीत होणे अपेक्षित आहे.

कामांना गती मिळणार कधी?
च् कल्याण स्टेशन परिसर विकासाची निविदा नव्याने मागविली आहे. त्यावर विचारविनिमय होऊ घातलेल्या स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत अपेक्षित आहे.
च् स्मार्ट सिटीसाठी महापालिकेची २०१६ मध्ये निवड झाली. तेव्हापासून महापालिका प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे, कंपनी स्थापन करणे, संचालक मंडळ नेमणे, कर्मचारी व अधिकारी नेमणे आणि बैठका घेणे हे काम सुरू आहे.
च् विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी आयुक्तांनी एक पत्रकार परिषद घेऊन स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना गती दिली जाईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, स्मार्ट सिटीचे काम पुन्हा रेंगाळलेले दिसून येत आहे.
च्स्मार्ट सिटीअंतर्गत घेतलेल्या सिटी पार्कच्या प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू होते. त्याचे खोदकाम करण्यात आले होते. मात्र, त्याला अतिवृष्टीचा फटका बसला होता. अजूनही त्याला मिळालेली गती दिसून येत नाही.

Web Title: Rampage from 'LED' tender?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.