मुरबाडमध्ये भर रस्त्यात लुटमार करत हत्या

By admin | Published: July 8, 2017 05:41 AM2017-07-08T05:41:10+5:302017-07-08T05:41:10+5:30

येथे भर रस्त्यात दोघा दुचाकीस्वारांना अडवून त्यांना मारहाण करत त्यांच्याकडील लाखोंची रोकड घेऊन तिघेजण पसार झले. या वेळी झालेल्या हाणामारीत

Rampage on the road in Murbad, killing him | मुरबाडमध्ये भर रस्त्यात लुटमार करत हत्या

मुरबाडमध्ये भर रस्त्यात लुटमार करत हत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुरबाड : येथे भर रस्त्यात दोघा दुचाकीस्वारांना अडवून त्यांना मारहाण करत त्यांच्याकडील लाखोंची रोकड घेऊन तिघेजण पसार झले. या वेळी झालेल्या हाणामारीत एक ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.
जाभुंर्डे येथील प्रीतम भरत मार्के (२८) हा मालकाच्या सांगण्यावरून आपला साथीदार शैलेश शहा (५०) याच्यासोबत मुरबाड शहरातील एका कटलरी व्यापाऱ्याकडे मालाचे पैसे वसूल करण्यासाठी जात होता. म्हसा मार्गे धसईकडे जात असताना तिघा दुचाकी स्वारांनी त्यांची बाईक अडवत त्यांना जबर मारहाण केली. आणि त्यांच्याकडील लाखोंची रक्कम घेऊन पलायन केले. मात्र, त्यांना झालेल्या जबर मारहाणीत प्रीतम मार्के हा जागीच ठार झाला तर शैलेश गंभीर जखमी झाला आहे.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी ठिकठिकाणी त्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी पथके रवाना केली. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या कामावर संताप व्यक्त केला.

Web Title: Rampage on the road in Murbad, killing him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.