जिल्हा परिषदेच्या आवारात रानभाज्या महाेत्सवात ठाणेकर!
By सुरेश लोखंडे | Published: August 25, 2023 06:25 PM2023-08-25T18:25:31+5:302023-08-25T18:25:50+5:30
रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व शहरी भागात रानभाज्याची विक्री करण्यासाठी या रानभाज्या महोत्सवाचे आयाेजन जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंणेकडून करण्यात आले
ठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या आवारात रानभाज्या महोत्सव उत्साहात पार पडला. मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला वंदन करत या महोत्सवाचे दिप प्रज्वलन करून उद्घाटन केले. यास शुक्रवारी ठाणेकर गृहिणींनी उत्तम प्रतिसाद दिला.
रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व शहरी भागात रानभाज्याची विक्री करण्यासाठी या रानभाज्या महोत्सवाचे आयाेजन जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंणेकडून करण्यात आले. महोत्सवात भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण, अंबरनाथ तालुक्यातील ४० स्टॉल लावण्यात आले. या स्टाॅलवर पावसाळ्यातील औषधी व गुणकारी रानभाज्या उपलब्ध असून आघाडा, शेवळा, कुलूची भाजी, भारंग, मायाळू, कपाळफोडी, दिंडा भाजी, करटोली, टाकळा इतर सर्व रानभाज्या विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या हाेत्या.उद्घाटनानंतर जिंदल यांनी उमेदच्या महिलांना शुभेच्छा यावेळी दिल्या. ते म्हणाले की निसर्गाने आपल्याला जे दिलंय ते तुम्ही शहरी भागातील लोकांना देताय हे अतिशय महत्त्वाचे आहे. सध्याच्या काळात तरुण लोकांमध्ये हार्ट ॲटॅकचे प्रमाण वाढत आहे. सर्वांची प्रतिकारशक्ती कमी होत आहे कारण रोजच्या जेवणातील पोषण घटक कमी होत आहेत. जीवनशैली बदलत चाललेली आहे. त्यामुळे प्रतिज्ञा करायला हवी की आठवड्यातून एक दिवस रानभाज्या खायला हव्यात.
आरोग्य सुधारण्यासाठी रानभाज्या लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आपला उपक्रम महत्त्वाचं आहे, असेही जिंदल यांनी यावेळी स्पष्ट केले. या कार्यक्रमात उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, यांनी मानवाच्या रक्ताच्या पेशी वाढवण्यासाठी रानभाज्या पुर्ण वर्षभरात केवळ पावसाळ्याच्या १-२ महिन्यात उपलब्ध होत असल्याचे सांिगतले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छाया शिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) प्रमोद काळे, महिला बालकल्याण विभाग प्रमुख संजय बागुल आदी अधिकार्यांस ठाणेकर या महाेत्सवासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते