उल्हासनगरातील टाऊन हॉल मध्ये रंगला सांस्कृतिक कार्यक्रम, स्ट्रीट विजेत्यांचा सत्कार
By सदानंद नाईक | Published: January 27, 2023 07:27 PM2023-01-27T19:27:34+5:302023-01-27T19:27:51+5:30
प्रजासत्ताक दिनानिमित्त आमदार कुमार आयलानी यांनी टाऊन हॉल मध्ये आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
उल्हासनगर : प्रजासत्ताक दिनानिमित्त आमदार कुमार आयलानी यांनी टाऊन हॉल मध्ये आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आयलानी यांनी आयोजित केलेल्या हॅपी स्ट्रीट कार्यक्रमातील विजेत्या स्पर्धक व शाळांना गौरविण्यात आले.
उल्हासनगर टाऊन हॉल मध्ये प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आमदार कुमार आयलानी यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शहरातील विविध शाळेतील मुलांनी यामध्ये सहभाग नोंदविला. टाऊन हॉल मध्ये दिन सत्रात चाललेल्या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. गेल्या महिन्यात गोलमैदान परिसरात आयोजित केलेल्या हॅपी स्ट्रीट कार्यक्रमात शहरातील शाळा, महाविद्यालय, सामाजिक संघटना, योगा संघटना आदींनी सहभाग नोंदविला होता. यातील विजेत्या शाळा व मुलांना यावेळी गौरविण्यात आले. संच्युरी शाळेच्या मुख्यध्यापिका बबिता सिंग यांच्यासह सहकारी शिक्षकांना ट्रॉफी देऊन गौरविले आहे.
प्रजासत्ताक दिनी टाऊन हॉल मध्ये दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना, परिसरातील आरकेटी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनी तोफ व मिसाईलची प्रतिकृती बनवून एक वेगळा आदर्श ठेवला. यावेळी मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी मुलांनी बनविलेल्या तोफा व मिसाईलचे कौतुक केले. एनसीसीच्या मुलांनी तोफा व मिसाईलचे प्रात्यक्षिक दाखवून पाहुण्यांना याद्वारे सलामी दिली. तर शहर मनसे कडून गरीब व गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. शहर काँग्रेस पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनीही प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.