एमपीएससी, यूपीएससी ट्रेनिंग सेंटरमध्ये रंगली जाेरदार ओली पार्टी; अंबरनाथमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 07:00 AM2022-03-19T07:00:16+5:302022-03-19T07:00:24+5:30

व्हिडीओ व्हायरल

Rangli Jairdar Oli Party at MPSC, UPSC Training Center; Inccident in Ambernath | एमपीएससी, यूपीएससी ट्रेनिंग सेंटरमध्ये रंगली जाेरदार ओली पार्टी; अंबरनाथमधील प्रकार

एमपीएससी, यूपीएससी ट्रेनिंग सेंटरमध्ये रंगली जाेरदार ओली पार्टी; अंबरनाथमधील प्रकार

Next

अंबरनाथ :  अंबरनाथ नगरपालिकेने उभारलेल्या यूपीएससी ट्रेनिंग सेंटरमध्ये पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची दारूपार्टी रंगल्याची बाब समोर आली आहे. याच यूपीएससी सेंटरमध्ये कोरोनाकाळात कोविड रुग्णालय उभारले होते. त्याच ठिकाणी ही ओली पार्टी रंगल्याने आणि तक्रार करून दोषींवर कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. ही घटना २८ फेब्रुवारीची असली तरी हा व्हिडिओ गुरुवारी व्हायरल झाल्यावर ही बाब समोर आली.

अंबरनाथ नगरपालिकेने पूर्व भागात शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या समोरच एमपीएससी आणि यूपीएससी ट्रेनिंग सेंटर उभारले आहे. या प्रशस्त इमारतीत कोरोना काळात रुग्णालय सुरू करून अनेक रुग्णांचे जीव वाचविण्याचे काम केले. याच सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या 
सफाई कर्मचाऱ्यांनी चक्क लायब्ररीसाठी राखीव असलेल्या खोलीत दारूची पार्टी केल्याची बाब समोर आली आहे. 

विशेष म्हणजे कल्याण-डोंबिवलीचे नगरसेवक ही इमारत कशा स्वरूपाने बनवली आहे ते पाहण्यासाठी अंबरनाथमध्ये आलेले असताना ती इमारत दाखविण्यासाठी स्थानिक नगरसेवक सुभाष साळुंके हे गेले असता त्या ठिकाणी ओली पार्टी सुरू असल्याची बाब समोर आली.  हा सर्व प्रकार २८ फेब्रुवारी रोजी घडला असून, त्याची व्हिडिओ क्लिप मुख्याधिकाऱ्यांना आणि आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. मात्र, पंधरा दिवस उलटल्यानंतरदेखील या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

बेशिस्त, कामचुकारांवर कारवाईची मागणी

अंबरनाथ पालिकेतील अनेक कर्मचारी हे कामचुकारपणा करीत असल्याची बाब तक्रारीच्या माध्यमातून समोर आली आहे. हे कर्मचारी बेशिस्त वर्तणूक व कामचुकारपणा करीत असल्याचे समोर आले आहे. चक्क ऑन ड्युटी दारू पार्टी शासकीय कार्यालयात आयोजित करून सर्वांचा संताप ओढवून घेण्यात आले आहे. या बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका व्यक्त केली.

Web Title: Rangli Jairdar Oli Party at MPSC, UPSC Training Center; Inccident in Ambernath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.