कल्याणमध्ये रंगली ब्लॅक इज ब्युटीफुल स्पर्धा; खास महिलांसाठी सखीमंचतर्फे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 12:32 AM2020-02-04T00:32:58+5:302020-02-04T00:33:12+5:30
हळदीकुंकू, वन मिनिट गेम शोची धमाल
कल्याण : दिष्टी मिडिया आणि लोकमत सखीमंच आयोजित संक्रांत स्पेशल हळदीकुंकू सोहळा नुकताच कल्याण येथील मराठा समाज हॉल येथे पार पडला. काळी साडी नेसून त्याला साजेसे दागिने परिधान करून रॅम्प वॉक करीत ‘ब्लॅक इज ब्युटीफुल’ स्पर्धा पार पडली. एक मिनिट गाणी म्हणणे, उखाणा अशी धमाल गेम शो स्पर्धा पार पडली.
सक्षम नारी सेवाभावी संस्थेच्या वतीने लकी ड्रॉ मध्ये रंजना जाधव यांना साडी मिळाली. सक्षम नारी सेवाभावी संस्थेच्या स्वाती मोहिते व शीतल धुरी यांच्या हस्ते साडी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमास सखींचा उस्त्फूर्त प्रतिसाद मिळाला.
ब्लॅक इज ब्युटीफूल स्पर्धेचे परिक्षण ईशा ब्युटी पार्लरच्या संचालिका सरिता चर्तुभुज यांनी केले. जयेश राजे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून कार्यक्रमात रंगत आणली.
ब्लॅक इज ब्युटीफूलच्या विजेत्या
प्रथम : भाग्यश्री चौधरी
द्वितीय : रुजुता शेटे
तृतीय : मंगल चव्हाण
उत्तेजनार्थ : कुंदा चंदने
उत्तेजनार्थ : अश्विनी ब्राह्मणे
विशेष उल्लेखनीय : रुचिता बंड, रुपाली निंबाळकर.