रंगवून रंगुनी गुलाल फासतो, नैसर्गिक रंगांच्या वापराने सण साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 03:24 AM2018-03-03T03:24:15+5:302018-03-03T03:24:15+5:30

पाण्याचा दुष्काळ नसला, तरी पर्यावरणाभिमुख झालेल्या ठाणे जिल्हावासीयांनी यंदाही पाण्याचा काळजीपूर्वक करत, नैसर्गिक रंगांचा वापर करत शुक्रवारी कोरडी धुळवड साजरी केली.

Rangooni gulal fades, color is celebrated using natural colors | रंगवून रंगुनी गुलाल फासतो, नैसर्गिक रंगांच्या वापराने सण साजरा

रंगवून रंगुनी गुलाल फासतो, नैसर्गिक रंगांच्या वापराने सण साजरा

Next

ठाणे : पाण्याचा दुष्काळ नसला, तरी पर्यावरणाभिमुख झालेल्या ठाणे जिल्हावासीयांनी यंदाही पाण्याचा काळजीपूर्वक करत, नैसर्गिक रंगांचा वापर करत शुक्रवारी कोरडी धुळवड साजरी केली. संपूर्ण ठाणे जिल्हयात गुरूवारी सार्वजनिक आणि खाजगी मिळून सुमारे ४७०० होळ्यांचे दहन करण्यात आले. इतर सण-उत्सवांप्रमाणेच ठाण्यासह डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, भार्इंदरसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सामाजिक भान राखत होळी आणि धुलिवंदनाचा सण अपूर्व उत्साहात आणि आनंदात साजरा झाला.
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा पाण्याची टंचाई अद्याप जाणवू लागलेली नाही. मात्र पुढील दिवसांचा विचार करता ठाणेकरांनी पाण्याचा अतीवापर करणे टाळले. लहान मुले वगळता पिचकाºयांच्या वापरावर मर्यादा दिसून आली. काही परिसर वगळता पाण्याचा पिशव्यांचा वापरही कमी झाला. सामाजिक संस्थांबरोबर काही सोसायट्यांनीही पाणी आणि रासायनिक रंगाच्या वापराच्या निर्बंधाबाबत आधीच आवाहन केले होते. त्याला ठाणेकरांसह वेगवेगळ््या भागातील रहिवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. सकाळपासून सुरू झालेली कोरड्या रंगांची धूळवड दुपारपर्यंत साजरी झाली. धूळवडीनंतर काही ठिकाणी तरूणाई डीजेच्या तालावर थिरकली. काही संस्थांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यात होळीवर आधारित नृत्ये, लावण्यांचा युवा वर्गाने आनंद लुटला. कोरडी धुळवड खेळल्यानंतर आपला तसेच आपल्या ग्रुपचा सेल्फी टिपण्यात अनेक जण दंग होते.
वंदे मातरम् संघातर्फे मंगला हायस्कूलच्या आवारात खेलो होली इकोफ्रेंडली कार्यक्रम झाला. यात नैसर्गिक रंगांची लूट करण्यात आली. मनसे ठाणे शहरातर्फे रंग उत्सव नौपाडा येथील मध्यवर्ती कार्यालयात रंगला. यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव उपस्थित होते. तसेच सिग्नल शाळेतील मुलांनीही नैसर्गिक रंगांची उधळण करत धूळवड साजरी केली. सलग दुसºया वर्षी अभिनय कट्टयाच्या कलाकारांनी दिव्यांग कलाकेंद्रातील विद्यार्थी कलाकारांसोबत रंग उत्सव साजरा केला. कशिशपार्क येथेही रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर शहरात नाक्यानाक्यांवर, प्रमुख चौकात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. शहरातील प्रमुख रस्त्यांवर मात्र शांतता होती. टीएमटीच्या बसेस आणि धुळवड खेळलेले बाईकस्वार याशिवाय फारशी वर्दळ नव्हती. शहर आणि परिसरात सकाळपासूनच सर्व दुकाने आणि हॉटेल्स् बंद होती. गुरूवारी श्रीरंग सोसायटी, कळव्यातील मनीषानगर, नारळवाला चाळ, वृंदावन सोसायटी, ब्रह्मांड सोसायटीसह काही ठिकाणी पर्यावरणस्नेही होळीचे दहन झाले. पर्यावरण दक्षता मंचाच्यावतीने टाकाऊ वस्तूंची होळी करण्यात आली.
>कल्याण-डोंबिवलीत उत्साह
डोंबिवली : गुलाल आणि रंगांची उधळण करीत कल्याण-डोंबिवलीतील
सर्व वयोगटांतील आबालवृध्दांनी होळी आणि धुळवड उत्साहात साजरी केली.
विविध गाण्यांवर नृत्य सादर करून सर्वांनी होळींचा आनंद लुटला. तरूण-तरूणींचा कल हा नैसर्गिक रंगाकडे अधिक होता. पाणी व रंगांची उधळण करीत एकमेकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.पिसवली परिसरात बंजारी समाजाच्यामहिलांनी आपल्या पारंपारिक वेशभूषेत नृत्य सादर करून धुळवडीचा आनंद लुटला.
होळीमध्ये पुरणपोळी प्रसाद म्हणून न टाकता दान करावी या आवाहनला प्रतिसाद देता पॉझ फॉर हुमन्स या संस्थेने काही संस्थांना भेट देऊन १५० पुरणपोळीचे वाटप केले.
डोंबिवली पश्चिमेतील गौरू कॉम्प्लेक्स या सोसायटीने आवारातील कचरा व झाडांची पाने यांची प्रतिकात्मक छोटी
होळी केली.

Web Title: Rangooni gulal fades, color is celebrated using natural colors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.