अत्याचाराचा व्हिडीओ काढून खंडणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 02:49 AM2018-07-17T02:49:28+5:302018-07-17T02:49:33+5:30
दुसऱ्या तरुणीच्या जाळ्यात अडकलेल्या प्रियकराला पुन्हा प्राप्त करण्यासाठी त्याच्या आणखी एका प्रेयसीने ‘त्या’ तरुणीस गुंगीचे औषध पाजून तिच्यावर आपल्या साथीदारांकडून अत्याचार करवून घेतले.
भिवंडी : दुसऱ्या तरुणीच्या जाळ्यात अडकलेल्या प्रियकराला पुन्हा प्राप्त करण्यासाठी त्याच्या आणखी एका प्रेयसीने ‘त्या’ तरुणीस गुंगीचे औषध पाजून तिच्यावर आपल्या साथीदारांकडून अत्याचार करवून घेतले. इतकेच नव्हे तर या घटनेचा व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी वसुली करिता दबाव टाकला. त्या प्रेयसीसह पीडितेवर अत्याचार करणाºया दोघा तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबईतील कफ परेड येथे राहणारी २२ वर्षांची तरुणी शहरातील गायत्रीनगरमध्ये काकूकडे आली होती. त्यावेळी सतीश ऊर्फ भीमराव नकलवार याच्याशी तिचे प्रेमसंबंध जुळले. मात्र, सतीशचे लग्न होऊन त्यास दोन मुले असल्याचे समजल्यावर पीडित तरुणी त्याच्यापासून दूर राहू लागली. तरीही, त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केला. परिणामी ती गरोदर राहिली. ही घटना सतीशची अगोदरची प्रेयसी राबिया हिला कळली. तिने सतीशपासून पीडित तरुणीला दूर करण्याकरिता तिला आपल्या घरी बोलावले व गुंगीचे औषध पाजून सलीम यास अत्याचार करण्यास लावले. पोलिसांनी राबिया, सलीम तसेच सतीश या तिघांना अटक केली आहे.