आरोपीकडून सहा कोटी २० लाखांची खंडणी वसूली: प्रदीप शर्मांनी अटकपूर्व अर्ज घेतला मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 11:33 PM2021-08-09T23:33:27+5:302021-08-09T23:37:44+5:30

मोक्का अंतर्गत खोटा गुन्हा दाखल करुन त्यातून सुटकेसाठी आणि पोलीसांचा मार वाचविण्यासाठी सिंग यांच्या सांगण्यावरून शर्मा यांनी हे पैसे घेतल्याचा आरोप केतन तन्ना यांनी केला आहे. तन्रा यांच्याकडून एक कोटी २१ लाख रुपये, क्रिकेट बुकी सोनू जालान याच्याकडून तीन कोटी ४५ लाख तसेच रियाज भाटी याच्याकडून एक कोटी ५० लाखांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे.

Ransom of Rs 6 crore 20 lakh recovered from accused: Pradip Sharma withdraws pre-arrest application | आरोपीकडून सहा कोटी २० लाखांची खंडणी वसूली: प्रदीप शर्मांनी अटकपूर्व अर्ज घेतला मागे

आरोपीकडून सहा कोटी २० लाखांची खंडणी वसूली: प्रदीप शर्मांनी अटकपूर्व अर्ज घेतला मागे

Next
ठळक मुद्दे आरोपीकडून सहा कोटी २० लाखांची खंडणी वसूली: प्रदीप शर्मांनी अटकपूर्व अर्ज घेतला मागेअटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: आरोपींना मोका लावण्याची भीती दाखवित त्यांच्याकडून सहा कोटी २० लाखांची खंडणी उकळल्याचा आरोप असलेले निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी आपला अटकपूर्व अर्ज ठाणे न्यायालयातून मागे घेतला आहे. त्यामुळे त्यांच्यासह २८ आरोपींच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
मोक्का अंतर्गत खोटा गुन्हा दाखल करुन त्यातून सुटकेसाठी आणि पोलीसांचा मार वाचविण्यासाठी सिंग यांच्या सांगण्यावरून शर्मा यांनी हे पैसे घेतल्याचा आरोप केतन तन्ना यांनी केला आहे. तन्रा यांच्याकडून एक कोटी २१ लाख रुपये, क्रिकेट बुकी सोनू जालान याच्याकडून तीन कोटी ४५ लाख तसेच रियाज भाटी याच्याकडून एक कोटी ५० लाखांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अलिकडेच माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त एन. टी. कदम तसेच खासगी व्यक्ती संजय पुनामिया, विकास दाभाडे, कुख्यात गुंड रवी पुजारी, विमल अग्रवाल, बरखा अग्रवाल, किशोर अग्रवाल, रितेश शाह आणि मुजावर आदी २८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
* यातील कथित आरोपी शर्मा हे अंटालिया स्फोटक प्रकरणात एनआयएच्या न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे त्यांना तळोजा कारागृहात आहेत. याच कारागृहातून त्यांनी काही दिवसांपूर्वी ठाणेनगरच्या खंडणीतील गुन्हयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज त्यांनी आपल्या वकिलांच्या मार्फतीने सोमवारी मागे घेतला.
*याच प्रकरणातील अन्य एक आरोपी सुनील देसाई यानीही अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. त्याची सुनावणीही सोमवारी होती. मात्र, त्याचे वकील हजर नसल्यामुळे त्याच्या अर्जावर आता १९ आॅगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. यातील अन्य एक आरोपी विकास दाभाडे यानेही याआधीच अटकपूर्व जामीनाचा अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे सध्या तरी यातील एकाही आरोपीला न्यायालयाने अटकेपासून कोणतेही संरक्षण दिले नसल्याची माहिती तक्रारदार केतन तन्ना यांचे वकील सागर कदम यांनी दिली.

Web Title: Ransom of Rs 6 crore 20 lakh recovered from accused: Pradip Sharma withdraws pre-arrest application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.