रेल्वेच्या बंद पडलेल्या कर्मचारी कॉलनीमध्ये बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:39 AM2021-09-13T04:39:55+5:302021-09-13T04:39:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : गुन्हेगारांचा अड्डा झालेला उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसर व स्कायवॉकशेजारील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बंद निवासस्थानात अल्पवयीन ...

Rape in a closed railway employee colony | रेल्वेच्या बंद पडलेल्या कर्मचारी कॉलनीमध्ये बलात्कार

रेल्वेच्या बंद पडलेल्या कर्मचारी कॉलनीमध्ये बलात्कार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : गुन्हेगारांचा अड्डा झालेला उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसर व स्कायवॉकशेजारील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बंद निवासस्थानात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली. रात्री १० वाजल्यानंतर गर्दुल्ले, भुरट्या चोरांच्या दहशतीमुळे नागरिक स्कायवॉकवरून जाण्याची हिंमत करू शकत नाही; मात्र याकडे दुर्लक्ष झाल्यानेच बलात्कारासारखी गंभीर घटना घडल्याची चर्चा परिसरात आहे.

रेल्वेच्या बंद पडलेल्या जुन्या क्वार्टरमध्ये शुक्रवारी रात्री १४ वर्षांच्या मुलीला धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचे शनिवारी दुपारी उघड झाले. या घटनेनंतर जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने बंद पडलेल्या कर्मचारी निवासस्थानांची झाडाझडती घेऊन खोल्यातील रेल्वे ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. ज्या खोलीत अत्याचाराची घटना घडली, त्या खोलीची तपासणी केल्याची माहिती रेल्वे पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमार यांनी दिली.

उल्हासनगरवासीयांना रेल्वे स्टेशन परिसरात येणे-जाणे सोयीचे व्हावे, म्हणून स्टेशनच्या दोन्ही बाजूला कोट्यवधी रुपयांच्या निधीतून एमएमआरडीएने स्कायवॉक बनविला; मात्र काही वर्षांतच स्कायवॉकचा दुरुपयोग सुरू झाला. स्टेशन परिसरातील संजय गांधीनगर, समतानगर, इमलीपाडा, लेबर्स कॉलनी आदी परिसरातील नशेखोर, गर्दुल्ले, भुरटे चोर आदींनी स्कायवॉकवर आपला धाक बसवल्याने रात्री १० नंतर नागरिक स्कायवॉकवरून जाऊ शकत नाही. स्कायवॉकवर काही नशेखोरांनी एका इसमाचा दारू पिण्यास पैसे देत नसल्याच्या कारणावरून खून केल्याची घटना काही वर्षांपूर्वी घडली होती. एका वाहतूक पोलिसावरही येथे जीवघेणा हल्ला झाला होता. चोरी, लूटमार, कॉलेज मुलींना छेडणे, कॉलेजच्या तरुणांना धाक दाखवून लुटणे आदी अनेक प्रकार येथे घडले आहेत.

.........

पोलीस चौक्या सुरू करण्याची गरज

उल्हासनगर रेल्वे स्टेशनसमोरील रिक्षांची व गाडीची तोडफोड, पश्चिम बाजूच्या दुकानदारांची तोडफोड व मारहाण, स्टेशन परिसरात दहशत निर्माण करणे आदी प्रकार नशेखोर, गर्दुल्ले, भुरटे चोर करीत असून याप्रकरणी मध्यवर्ती व विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र गांजा, गावठी दारूची सर्रासपणे विक्री आजही होत आहे. स्थानिक पोलिसांनी अनेकदा कारवाई करूनही गावठी दारू विक्री, गांजा विक्रीचे अड्डे पूर्णतः नष्ट का होत नाहीत, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूला पोलीस चौक्या होत्या. स्टेशनच्या नूतनीकरणानंतर पूर्वेतील चौकी जागा नसल्याचे कारण देऊन बंद करण्यात आली. पश्चिमेतील सीएचएम कॉलेजसमोरील पोलीस चौकी नावालाच सुरू असून दोन्ही चौक्या सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

Web Title: Rape in a closed railway employee colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.