पोलिसाचा सहका-याच्या पत्नीवर बलात्कार; अंबरनाथमधील घटना, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 03:56 AM2017-09-17T03:56:39+5:302017-09-17T03:56:52+5:30
अंबरनाथमध्ये राहणा-या एका पोलिसाच्या पत्नीवर त्याच्याच एका सहकारी मित्राने बलात्कार केला. हा प्रकार पतीला कळताच त्याने शनिवार तक्रार दाखल केली आहे.
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये राहणा-या एका पोलिसाच्या पत्नीवर त्याच्याच एका सहकारी मित्राने बलात्कार केला. हा प्रकार पतीला कळताच त्याने शनिवार तक्रार दाखल केली आहे.
योगीराज वाघ या पोलिसाने आपल्याच सहका-याच्या पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. या नराधमाने मित्राच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवला. पती आणि मुलाला ठार मारण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केले. योगीराजचे आपल्या मित्राच्या घरी येणेजाणे होते. याचदरम्यान त्याने मित्राच्या पत्नीवर वाईट नजर ठेवून अनेक वेळा अत्याचार केला. आरोपी हा पोलीस असल्याने आणि आपल्या पतीला आणि मुलाला मारण्याची धमकी दिल्याने विवाहिता प्रचंड दबावाखाली होती.
काही दिवसांपासून पीडित महिला अस्वस्थ होती. पतीने तिला विश्वासात घेऊन कारण विचारले. तेव्हा तिने घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात योगीराजविरोधात गुन्हा दाखल झाला असून अद्याप आरोपी पोलिसाला अटक केलेली नाही. आपण स्वत: पोलीस खात्यात असून आपल्याला पोलीस सहकार्य करत नसल्याची खंत पीडित महिलेच्या पतीने व्यक्त केली आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू असून, आरोपीला लवकरच अटक करू.
- सुनील पाटील,
सहायक पोलीस आयुक्त