दुर्मिळ खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 04:38 PM2022-01-27T16:38:09+5:302022-01-27T16:41:51+5:30
दुर्मिळ वन्यजीव संरक्षित असलेल्या खवले मांजराची साडे पाच किलोची १२ लाखांच्या खवल्यांची विक्री करण्यासाठी आलेल्या किरण धनवडे (३१, रा. जय मल्हारनगर, घाटकोपर, मुंबई) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी गुरुवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: दुर्मिळ वन्यजीव संरक्षित असलेल्या खवले मांजराची साडे पाच किलोची १२ लाखांच्या खवल्यांची विक्री करण्यासाठी आलेल्या किरण धनवडे (३१, रा. जय मल्हारनगर, घाटकोपर, मुंबई) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी गुरुवारी दिली. त्याच्याकडून १२ लाखांची साडे पाच किलो खवले जप्त केली आहे.
श्रीनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील वागळे इस्टेट परिसरात रोड क्रमांक २२ च्या सर्कलजवळ किरण धनवडे हा दुर्मिळ प्रजातीच्या खवल्या मांजराच्या खवल्यांच्या विक्र ीसाठी येणार असल्याची टीप सहायक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे यांना मिळाली होती. त्याच आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरूण क्षिरसागर, सहायक पोलीस निरीक्षक शिंदे, जमादार सालदूर, हवालदार विजय पाटील आणि सुनिल निकम आदींच्या पथकाने वनविभाग अधिकाऱ्यांच्या मदतीने सापळा रचून २६ जानेवारी रोजी किरण याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून साडे पाच किलोची खवलेही जप्त केली आहेत. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ च्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी ही खवले कुठून शिकार करुन मिळविली त्याची ते कोणास विक्र ी करणार होते, याचा तपास तपास श्रीनगर पोलीस करीत आहेत.