दुर्मिळ स्टॉर्क बर्डचे ठाण्यात दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 12:34 AM2019-01-23T00:34:25+5:302019-01-23T00:34:36+5:30
जवळपास साडेतीन ते चार फुट उंच तसेच एक ते दीड फुट लांब चोच असलेला करडा-काळ्या रंगाच्या ‘स्टॉर्क’ या दुर्मिळ पक्षाचे जखमी अवस्थेत कल्याण येथे दर्शन झाले.
ठाणे : जवळपास साडेतीन ते चार फुट उंच तसेच एक ते दीड फुट लांब चोच असलेला करडा-काळ्या रंगाच्या ‘स्टॉर्क’ या दुर्मिळ पक्षाचे जखमी अवस्थेत कल्याण येथे दर्शन झाले. ठाण्यातील एसपीसीए या संस्थेत त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याला मराठीत ‘तुटवडा’असे संबोधले जाते. हा पक्षी प्रामुख्याने अमेरिका, युरोप आणि आशिया या देशांत वेगवेगळ्या छटांमध्ये आढळून येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
स्टॉर्क (तुटवडा) हा पक्षी जखमी अवस्थेत कल्याणमध्ये वन विभागाच्या निदर्शनास आला. लांब पंख असलेल्या या पक्ष्याच्या एका पंखाला जखम झाल्याने त्याला भरारी घेता येत नव्हती. त्याला ८ जानेवारी रोजी वनविभागाने ठाण्यातील एसपीसीए या पशुपक्ष्यांवर उपचार करणाऱ्या संस्थेत उपचारार्थ दाखल केले. तेव्हापासून त्याला वेदनाशामक आणि विविध प्रकारचे टॉनिक दिले जात आहे. नर जातीच्या या पक्ष्याचे वजन साधारणता: तीन ते साडेतीन किलो आहे. त्याची उंची साडेतीन ते ४ फुट असून, चोच जवळपास १ ते दीड फुट लांब आहे. त्याचे पाय दीड ते दोन फुट इतके उंच आहेत. पंखही लांब आहेत. हा पक्षी प्रामुख्याने पाणथळ जागी आढळून येतो. छोटे-छोटे मासे, कीडे हे त्याचे आवडते खाद्य आहे.
>स्टॉर्क बर्ड अमेरिका आणि युरोपमध्ये पांढºया रंगछटात आढळून येतो. काही दिवसांपासून तो औषधाला प्रतिसाद देत असून, सध्या त्याला उडता येत नाही. जखम बरी झाल्यावर ज्या परिसरात तो आढळून आला तेथे त्याला वनविभागामार्फत सोडले जाईल, अशी माहिती या पक्ष्यावर उपचार करणारे संस्थेचे वैद्यकीय अधिकारी सुहास राणे यांनी दिली.