शेतकरी अंदोलनास पाठिंबा देण्यासाठी भिवंडीतील अंबाडी येथे रास्तारोको अंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 06:50 PM2021-02-06T18:50:57+5:302021-02-06T18:51:10+5:30
ठाणे जिल्ह्यातील रास्तारोको अंदोलन भिवंडी वाडा रस्त्यावरील अंबाडी या मध्यवर्ती ठिकाणी करण्यात आले.
-नितिन पंडीत
भिवंडी- केंद्र सरकारच्या केंद्रिय कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी वर्ग संतप्त असुन मागील साठ दिवसां पासुन दिल्ली च्या सीमेवर देशभरातील शेतकरी अंदोलन करीत असतानाही त्याची दखल केंद्र सरकार घेत नसल्याने देशभरात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती च्या माध्यमातुन शनिवारी चक्का जाम रास्ता रोको अंदोलन पुकारण्यात आले होते. ठाणे जिल्ह्यातील रास्तारोको अंदोलन भिवंडी वाडा रस्त्यावरील अंबाडी या मध्यवर्ती ठिकाणी करण्यात आले.
सिपीआय,सिपीएम,किसानसभा,प्रहार,क्रांतिकारी, मार्क्सवादी, सिटु, सिपीएम ,आरपीआय सेक्युलर, लोकराज संघटना या संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या या अंदोलनात आत्माराम विशे ,काॅ. रमेश जाधव ,अॅड.किरण चन्ने ,काॅ .सुनिल चव्हाण, डॉ.निलेश जेडगे,काॅ. विजय लोलेवार, प्रेम प्रधान यांच्या नेतृत्वा खालील या अंदोलनात भिवंडी, शहापूर ,मुरबाड या ग्रामीण भागातील शेतकरी स्त्री पुरुष ,कष्टकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या आंदोलनादरम्यान अंबाडी नाका या ठिकाणी सुमारे अर्धा तास रस्ता अडवून धरल्या नंतर गणेशपुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश सांगडे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने प्रमुख पदाधिकारी यांना अटक करुन या अंदोलनाची सांगता झाली.दरम्यान या अंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत होऊन खोळंबली होती.