टीएमटीच्या बसेसचे ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढले

By admin | Published: May 1, 2017 06:17 AM2017-05-01T06:17:28+5:302017-05-01T06:17:28+5:30

टीएमटी अर्थात ठाणे परिवहनच्या सेवेत जेएनएनयूआरएमच्या माध्यमातून टप्याटप्याने नव्या बस दाखल होत असल्या तरी

The ratio of breakdown of TMT buses increased | टीएमटीच्या बसेसचे ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढले

टीएमटीच्या बसेसचे ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढले

Next

ठाणे : टीएमटी अर्थात ठाणे परिवहनच्या सेवेत जेएनएनयूआरएमच्या माध्यमातून टप्याटप्याने नव्या बस दाखल होत असल्या तरी जुन्या बस रस्त्यावर धावण्याचे प्रमाण मात्र वेगाने कमी होऊ लागले आहे. परिवहनच्या तफ्यात ३१७ बसपैकी प्रत्यक्षात २०० च्या आसपासरस्त्यावर धावत असून त्यादेखील कमी उत्पन्न देणाऱ्या मार्गावर धावत आहेत. त्यातही आता त्या बसेसचे ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढले असून रोज ४० ते ४५ बस ब्रेकडाऊन होत आहेत. त्यामुळे परिवहनचा पाय आणखी खोलात रूतूतअसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ठेकेदाराच्या बसवरच आता परिवहनची आर्थिक नाडी अवलंबून राहणार असल्याचेही चित्र निर्माण झाले आहे.
ठाणे परिवहनच्या ताफ्यात आजघडीला ३१७ बसेस असून वागळे आगारातून रोज १७० ते १८० आणि कळवा आगारातून ३० ते ३५ रस्त्यावर धावत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु, ज्या दिवसापासून परिवहनच्या ताफ्यात ठेकेदाराच्या बस दाखल होण्यास सुरवात झाली आहे, तेव्हांपासून बसेसची संख्या आणखी रोडावली आहे. आजतर रस्त्यावर तुरळक बस धावत असल्याचे चित्र आहे. असे असतांना त्या बंद पडण्याचे प्रमाणही मागील काही दिवसांपासून पुन्हा वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली. आजघडीला रोज निघणाऱ्या २०० ते २१० पैकी ४० ते ४५ बस या ब्रेक डाऊन होत असल्याने त्याचा नाहक भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागत आहे. हा गाडा सुधारण्यासाठी परिवहनने आपल्या अंदाजपत्रकात पालिकेकडून कोट्यवधींचे अनुदान मागितले आहे. परंतु, ही सेवाही ठेकेदाराच्या बसेसवर अवलंबून असल्याचे चित्र आहे. ठेकेदाराच्या बस वेळेवर निघत असून परिवहनच्या बसचे वेळापत्रक हे आजही कोलमडलेले आहे. घोडबंदरच्या रहिवांशाना ठेकेदाराच्या बसचा फायदा होत असला तरीदेखील शहरातील इतर मार्गांवरील प्रवाशांना परिवहनच्या जुन्या बसचा आधार असल्याने त्यांना आजही बसथांब्यावर ताटकळत उभे राहावे लागवे लागत आहे. त्यात आता ब्रेक डाऊनचे प्रमाण वाढले असतांना त्यावर किरकोळ मुलामा लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान दुसरीकडे बसची संख्या कमी होत असतांना परिवहनचे उत्पन्न मात्र २५ लाखांच्या घरात गेले, ही जमेची बाजू असली तरी यातील अर्धे उत्पन्न हे ठेकेदारांच्याच बसपोटी मिळत असल्याचे सूत्र सांगतात. (प्रतिनिधी)

परिवहनची आर्थिक नाडी ठेकेदाराकडे?
ठाणे परिवहनच्या ताफ्यात आजघडीला ३१७ बसेस असून वागळे आगारातून रोज १७० ते १८० आणि कळवा आगारातून ३० ते ३५ रस्त्यावर धावत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु, ज्या दिवसापासून परिवहनच्या ताफ्यात ठेकेदाराच्या बस दाखल होण्यास सुरवात झाली आहे, तेव्हांपासून बसेसची संख्या आणखी रोडावली आहे. येत्या काळात परिवहनची आर्थिक नाडीदेखील ठेकेदाराकडे जाणार असल्याचेच चित्र यातून पुढे आले आहे.

Web Title: The ratio of breakdown of TMT buses increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.