आधारकार्ड रेशनींग कार्डला लिंक न केल्याने रहिवाशांचे रेशन झाले बंद, संतप्त रहिवासी धडकले रेशनिंग आॅफीसवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 04:14 PM2018-04-09T16:14:25+5:302018-04-09T16:14:25+5:30

रेशनिंग कार्ड आधारला लिंक न केल्याने मागील कित्येक वर्षापासून ठाण्यातील झोपडपट्टी भागातील रहिवाशांना रेशनच मिळत नसल्याचा बाब समोर आली आहे. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी सोमवारी वंदना येथील रेशनिंग आॅफीसवर मोर्चा काढण्यात आला.

Ration of residents did not link to Aadhar card, no rationing card stopped, angry residents stopped at rationing office | आधारकार्ड रेशनींग कार्डला लिंक न केल्याने रहिवाशांचे रेशन झाले बंद, संतप्त रहिवासी धडकले रेशनिंग आॅफीसवर

आधारकार्ड रेशनींग कार्डला लिंक न केल्याने रहिवाशांचे रेशन झाले बंद, संतप्त रहिवासी धडकले रेशनिंग आॅफीसवर

Next
ठळक मुद्देरेशन मिळाले नाही तर दुकाने लुटण्यात येतीलआमदार जितेंद्र आव्हाडांनी दिला इशारा

ठाणे -आधारकार्ड रेशनींग कार्डला लिंक न  केल्याने ठाण्यातील अनेक रहिवाशांना रेशनदुकानावर राशनच मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी सोमवारी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली रेशनिंग आॅफीसवर मोर्चा काढला होता. यावेळी गोरगरीब जनतेला रेशन मिळाले नाही तर दुकानच लुटली जातील असा इशारा आव्हाडांनी दिला.
             सर्वच यंत्रणांना आधारकार्ड लिंक करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. परंतु या प्रक्रियेला पुन्हा जून पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. असे असतांना देखील ठाण्यातील अनेक झोपडपट्टीभागातील रहिवाशांना आधारकार्ड लिंक केले नसल्याने रेशनच देण्याचे बंद करण्यात आल्याचा आरोप मोर्चेकर्त्यांनी केला आहे. एकीकडे केंद्र सरकारच्या अनेक धोरणामुंळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. भाववाढीने सर्वसामान्यांना जगणे मुश्किल झाले असतांना आता रेशनवरही या गोरगरीब जनतेला धान्य मिळत नसेल तर हा प्रकार अतिशय चुकीचा असल्याचे मत यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी आणि रेशनवर सर्व धान्य उपलब्ध व्हावे या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रेशनिंग आॅफीसमध्ये सर्व्हर डाऊन असणे, नेटचा प्रॉब्लेम असणे आदींसह इतर समस्या असतांना विनाकारण नागरीकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु नागरीकांना रेशनिंग मिळावे असे आश्वासन यावेळी घेण्यात आले आहे. तरी देखील रेशनिंग उपलब्ध झाले नाही, तर मात्र रेशनिगंची दुकानेच लुटली जातील असा इशाराही यावेळी आव्हाडांनी दिला.



 

Web Title: Ration of residents did not link to Aadhar card, no rationing card stopped, angry residents stopped at rationing office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.