रंगमंच कामगारांना शिधावाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:26 AM2021-06-23T04:26:13+5:302021-06-23T04:26:13+5:30

ठाणे : चित्रपट, नाटक या मनोरंजनामुळे प्रेक्षक काही काळ आपले दु:ख विसरतात. प्रेक्षकांचे मनोरंजन कलाकारांच्या माध्यमातून होत असले ...

Ration to theater workers | रंगमंच कामगारांना शिधावाटप

रंगमंच कामगारांना शिधावाटप

Next

ठाणे : चित्रपट, नाटक या मनोरंजनामुळे प्रेक्षक काही काळ आपले दु:ख विसरतात. प्रेक्षकांचे मनोरंजन कलाकारांच्या माध्यमातून होत असले तरी यामागे अनेक हात राबत असतात. परंतु, कोविड कालावधीत नाट्यगृहे बंद असल्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांचे कामदेखील बंद झाले आहे. रसिकांच्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या या कामगारांना दिलासा मिळावा, यासाठी मंगळवारी महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते शिधावाटप करण्यात आले.

तीनहातनाका येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकात महापौर व ग्रॅण्ड मराठा फाऊंडेशनने शिवसेना पक्षाच्या ५५व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून हे वाटप केले. यावेळी दिग्दर्शक विजू माने, ग्रॅण्ड मराठा फाऊंडेशनचे राजेश तावडे उपस्थित होते. यावेळी १०० रंगमंच कामगारांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

Web Title: Ration to theater workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.