डोंबिवलीतील आयरे गाव विभागातील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता चोरला?कॉंग्रेस नेते रवी पाटील यांची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 02:04 PM2017-12-02T14:04:30+5:302017-12-02T14:07:56+5:30
डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक ६६ आयरे गाव परिसरातील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता चोरील जात असल्याची तक्रार काँग्रेस नेते रवी पाटील यांनी केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे ग प्रभागक्षेत्र अधिकारी अधिका-यांसह रामनगर पोलिस ठाण्याला पत्र दिले आहे. त्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि रस्ता पुन्हा ग्रामस्थांच्या सुविधेसाठी द्यावा असे त्यांनी पत्रात म्हंटले आहे.
डोंबिवली: येथिल प्रभाग क्रमांक ६६ आयरे गाव परिसरातील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता चोरील जात असल्याची तक्रार काँग्रेस नेते रवी पाटील यांनी केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे ग प्रभागक्षेत्र अधिकारी अधिका-यांसह रामनगर पोलिस ठाण्याला पत्र दिले आहे. त्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि रस्ता पुन्हा ग्रामस्थांच्या सुविधेसाठी द्यावा असे त्यांनी पत्रात म्हंटले आहे.
त्या ठिकाणच्या स्मशानभूमी रस्त्याचे काम सुरु असून ते काम करतांना पूर्ण रस्ता उखडण्यात आला आहे. जेसीद्वारे माती उखडण्यात आली आहे. कच्च्या रस्त्याची माती ठेकेदाराने उचलून नेली असून चांगली माती विकतांना कोणतीही रॉयल्टी देखिल जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना भरलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रस्त्याचे काम करतांना त्याखाली पाण्याच्या लाइन, पथदिवे आदींच्या केबल्स तुटल्या, त्यामुळे त्या ठिकाणी काही दिवसांपासून रात्रीच्या वेळेत अंधार पसरलेला असतो. त्या ठिकाणी दिव्यांसह जलवाहिनीची दुरुस्ति तातडीने करणे गरजेचे होते, पण तसे मात्र झालेले नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली असून त्याकडे महापालिका प्रशानाने लक्ष द्यावे असेही ते म्हणाले. जेथे रस्त्याचे काम सुरु आहे त्यावर कोणाचेही बंधन नसल्याने गावाकडुन स्मशानाकडे जाणारा एकमेव रस्ता देखिल बंद झाल्याने नागरिकांना अंत्यविधीसाठी शहरातील अन्य ठिकाणी जावे लागण्याची शक्यता आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये, पूर्ण रस्ता बंद ठेवू नये, तसेच संबंधितांची चौकशी करुन जर नियमांची पायमल्ली झाली असेल तर संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशीही मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात ग प्रभाग समिती सभापती अलका म्हात्रे यांना पाटील यांनी पत्र दिले असून त्यावर म्हात्रे यांनी पाहणी करुन चौकशी करणार असल्याचे म्हंटले.