पालघरच्या परीक्षेत चव्हाण नापास!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 01:19 AM2019-10-26T01:19:54+5:302019-10-26T01:21:01+5:30

पुन्हा होणार का मंत्री?; ठाण्याचे पालकमंत्री म्हणून नाईकांची वर्णी लागण्याची चर्चा

Ravindra Chavan failed in Palghar exam! | पालघरच्या परीक्षेत चव्हाण नापास!

पालघरच्या परीक्षेत चव्हाण नापास!

googlenewsNext

- मुरलीधर भवार 

कल्याण : डोंबिवली मतदारसंघातून भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी यावेळी हॅट्ट्रिक केली. आधीच्या युती सरकारने चव्हाण यांना रायगड आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले होते. याशिवाय, पक्षाने अनेक जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर दिल्या होत्या.

निवडणुकीत त्यांनी ठाणे व रायगड जिल्ह्यांत चांगली कामगिरी केली. मात्र, पालघर जिल्ह्यात त्यांना अपयश मिळाले आहे. पालघरमध्ये एकही जागा भाजपला न मिळाल्याने पक्षाकडून चव्हाण यांना कदाचित पुन्हा मंत्रीपद दिलेही जाईल; मात्र त्यातून पालघरची जबाबदारी वगळली जाईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपमधून निवडून आलेले गणेश नाईक यांना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले जाण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

ठाणे जिल्ह्यात विधानसभेच्या १८ पैकी आठ जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. याशिवाय, मीरा-भार्इंदरमधून अपक्ष निवडून आलेल्या गीता जैन यांचा भाजपला पाठिंबा मिळेल, असे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपच्या खात्यात जिल्ह्यातील नऊ जागांची मोजणी केली जात आहे. जिल्ह्यात शिवसेनेच्या जागा मात्र कमी झालेल्या आहेत. शिवसेनेला पाच जणांवर विजय मिळवता आला. उर्वरित चार जागा अन्य पक्षांना मिळालेल्या आहेत. त्यामध्ये मनसे, समाजवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. त्यापैकी मनसे, समाजवादी आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भाजप-शिवसेनेला समर्थन देण्याची शक्यता कमी आहे. भाजपच्या यशामध्ये रवींद्र चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे.

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुराही चव्हाण यांच्या खांद्यावर होती. त्याठिकाणी शिवसेनेला तीन, भाजपला दोन जागांवर विजय मिळाला. याशिवाय, एक भाजपचा बंडखोर उमेदवारही निवडून आला आहे. या जिल्ह्यातील एक जागा राष्ट्रवादीला मिळाली आहे. सातपैकी एक अपक्ष धरून भाजपला तीन जागा मिळालेल्या आहे. ठाण्यातील नऊ आणि रायगडमधील तीन जागांची बेरीज केल्यास भाजपच्या खात्यात १२ जागा आहेत. पालघर जिल्ह्यातही चव्हाण यांनी मेहनत घेतली. मात्र, तेथील दोन्ही जागांवर भाजपला पराभव सहन करावा लागला. तळकोकणातही चव्हाण यांनी मेहनत घेतली. आमदार, राज्यमंत्री आणि दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदासह कोकण प्रांताची पक्षाची जबाबदारीही त्यांच्यावरच होती. उमेदवारांच्या मुलाखती घेणे, प्रचाराची रणनीती आखणे, प्रचारसभा आणि बैठका घेण्यासाठी चव्हाण यांनी दिवसरात्र एक केले.

२०१४ साली पार पडलेल्या निवडणुकीनंतर चव्हाण यांच्या मंत्रीपदाची चर्चा सुरू झाली. बºयाच उशिरा त्यांच्या नावापुढे राज्यमंत्रीपद लागले. त्यावेळी त्यांना कोणते खाते देणार, याची सुस्पष्टता नव्हती. पुढे त्यांना वैद्यकीय शिक्षण, बंदरे विकास, शिधावाटप आदी विविध खात्यांचे राज्यमंत्रीपद दिले गेले. त्यानंतर, त्यांनी कामांचा सपाटा सुरू करत, कोकणातील अनेक नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळवून दिले. ठाणे आणि रायगड जिल्ह्यात ते सेफ असल्याने त्यांचे मंत्रीपद कायम ठेवले जाईल. मात्र, पालघरमधील अपयशामुळे तेथील जबाबदारी काढून घेतली जाऊ शकते. त्यांची बढती केली जाऊ शकते, आहे त्याच पदावर त्यांना कायम ठेवले जाऊ शकते किंवा दुसरे खाते दिले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

दरम्यान, राष्ट्रवादीतून निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आलेले गणेश नाईक हे ऐरोलीतून निवडून आले आहेत. आघाडी सरकारच्या काळात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांनी १० वर्षे भूषविले. त्यामुळे शिंदे यांच्या वाट्याला ही जबाबदारी पुन्हा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. ठाणे जिल्हा हा पक्षाचा बालेकिल्ला असल्याने, शिवसेना आपला हक्क सोडणार नाही. त्यामुळे पालकमंत्रीपदावरून शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा रस्सीखेच होऊ शकते.

कथोरे यांना मंत्रीपद मिळणार का?

मुरबाड मतदारसंघातून भाजपतर्फे दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार किसन कथोरे यांनी विक्रमी मताधिक्य मिळविले आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार कपिल पाटील यांच्या विजयासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली होती. मुरबाड मतदारसंघातून भाजपतर्फे दुसºयांदा निवडून आलेले आमदार किसन कथोरे यांनी विक्रमी मताधिक्य मिळविले आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार कपिल पाटील यांच्या विजयासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली होती. ते दोनवेळा अंबरनाथ मतदारसंघातून, तर दोनवेळा मुरबाड मतदारसंघातून निवडून आले. त्याआधी त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही भूषवले होते. आघाडी सरकारच्या काळात त्यांना मंत्रीपद दिले गेले नाही.

Web Title: Ravindra Chavan failed in Palghar exam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.